घर Uncategorized सोमवारपासून पहिली ते सातवीचे वर्ग सुरू 

सोमवारपासून पहिली ते सातवीचे वर्ग सुरू 

337
0

पुणे: सोमवारपासून इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा नियमितपणे सुरू होतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना परिस्थितीच्या आढावा बैठकीत दिली. मागील आठवड्यात इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग अर्धा दिवस शाळा चालविण्याचा निर्णय घेण्यात आला होता आणि इयत्ता ९ वी आणि त्यापुढील इयत्तांचे वर्ग नियमित वेळेत भरविण्यात आले. बाधितांची संख्या आणि संसर्गाचा दर घटल्यामुळे पुढील आठवड्यापासून इयत्ता पहिली ते आठवीच्या शाळा नियमित वेळेत सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे पवार यांनी सांगितले.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचे प्रमाण कमी होणे ही चिंतेची बाब असून प्रशासनाने या वयोगटातील लसीकरणाला वेग देण्याच्या सूचनाही पवार यांनी केल्या. कुमार वयोगटासाठी लसींचा तुटवडा भासत आहे. लस उपलब्ध नसल्याने शनिवारी या वयोगटाचे करता आले नाही. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले की, सोमवारपासून लस पुरवठा नियमित होईल. लसींचा तुटवडा होणार नाही याची खात्री करण्यासाठी मी मुंबई आणि दिल्लीतील संबंधितांशी चर्चा करून या वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा वेग वाढविण्यात येईल असे पवार यांनी सांगितले.

घोड्यांच्या शर्यती आणि बैलगाडा शर्यतींसह विविध क्रीडा उपक्रमांचे आयोजन करण्यासाठी संपूर्ण राज्यात निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. एकूण क्षमतेच्या २५ टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी स्थानिक प्रशासनाला अधिकार देण्यात आले आहेत, असे पवार यांनी सांगितले. .

कोरोनाबाधितांची पुणे जिल्ह्यातील संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली असली तरी सरकार त्यावर संतुष्ट नाही. पुणे जिल्ह्यात गेल्या आठवड्यात ९० हजार कोरोनाबाधित रुग्ण होते, या आठवड्यात ते ४५ हजारांवर आले आहेत. मात्र, अजून काही काळ आकडेवारीकडे लक्ष ठेवावे लागेल. काही जिल्ह्यांमध्ये संसर्गाचा दर खूप जास्त आहे, याकडे पवार यांनी लक्ष वेधले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा