घर Pune चुकीच्या वीजबिलांबाबत कारवाईचा इशारा

चुकीच्या वीजबिलांबाबत कारवाईचा इशारा

477
0

पुणे: चुकीच्या वीजबिलांमुळे ग्राहकांना होणारा मनस्ताप वीज वितरण कंपनीच्या महसुलाचे नुकसान सहन केले जाणार नाही, असे महावितरणचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक विजय सिंघल यांनी सांगितले. चुकीचे रीडिंग घेणारे कर्मचारी आणि एजन्सी यांना केवळ एक नोटीस देऊन काळ्या यादीत टाकले जाईल; असा इशाराही त्यांनी दिला.

महावितरणच्या मुख्यालयात ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे राज्यभरातील प्रादेशिक संचालक, मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता आणि उपविभागीय अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला महावितरणचे सुमारे ७०० अभियंते व अधिकारी उपस्थित होते.

सिंघल यांनी म्हटले आहे की, ग्राहक वापरत असलेल्या युनिटनुसार वीज बिल आकारण्याची जबाबदारी महावितरणची आहे. यासाठी छायाचित्रांद्वारे मीटर रीडिंगसाठी स्वतंत्र मोबाईल ऍप तयार करण्यात आले असून रीडिंग घेण्याची प्रक्रिया सोपी आणि जलद करण्यात आली आहे. एजन्सींना प्रत्येक मीटर रीडिंगसाठी पैसे दिले जातात. मात्र, मीटरचे चुकीचे रीडिंग घेणे व अस्पष्ट छायाचित्र, रीडिंग न घेता शेरा देणे आदी गैरप्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. हे यापुढे सहन केले जाणार नाही, असे सिंघल म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा