घर Politics ‘आमचं नाव घेतलं तर चांगली ट्रीटमेंट, नाही तर…’

‘आमचं नाव घेतलं तर चांगली ट्रीटमेंट, नाही तर…’

18
0

डॉक्टर आणि वकील मेळाव्यात अजितदादांची मिश्किली 

इंदापूर: प्रतिनिधी

माणूस डॉक्टरांशी नेहेमी खरे बोलतो. तुमच्याकडे पेशंट आला की जरा मनात काय ते काढून घ्या. आमचं नाव घेतलं तर चांगली ट्रीटमेंट द्या. नाहीतर असं इंजेक्शन टोचा की…, अशी मिश्किल टिपण्णी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. त्यानंतर, सॉरी, मला तसं म्हणायचं नव्हतं, असे सांगत त्यावर कडी केली.

ही लोकसभा निवडणूक देशाचे भवितव्य ठराविणारी निवडणूक आहे. माझ्या डॉक्टर आणि वकील मित्रांनी एक विचार करावा. एकीकडे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचा चेहेरा आणि दुसरीकडे राहुल गांधी गृहीत धरू. कसे दिसेल ते चित्र, असा सवाल अजित पवार यांनी केला.

मोदी यांनी देशाच्या विकासासाठी अनेक महत्वाची कामे केली. देश प्रगतीपथावर नेला. जगात देशाची मान उंचावली. अयोध्येत गेल्या  पाचशे वर्षात श्रीरामांचे मंदिर उभारले गेले नव्हते. ते उभारले जावे अशी अनेकांची  इच्छा होती. ती मोदींनी पूर्ण केली, असे पवार यांनी नमूद केले.

मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. राज्याचा अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहे. मी आतापर्यंत अनेक पदांवर काम केले. आता आम्ही महायुतीचे सरकार चालवीत आहोत. आम्ही महायुतीत कामे व्हावी म्हणूनच आलो. आम्हाला सत्तेची हाव नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा