घर Business राज्यात येत आहे सौर उर्जेमधील नवीन तंत्रज्ञान, सनोरा सोलर टॉपकॉन मॉडेल मार्केटमध्ये...

राज्यात येत आहे सौर उर्जेमधील नवीन तंत्रज्ञान, सनोरा सोलर टॉपकॉन मॉडेल मार्केटमध्ये लॉन्च

26
0

पुणे : प्रतिनिधी

सौर उर्जेमधील नवीन तंत्रज्ञानचा समावेश असलेले व उच्च सोलर ऊर्जा क्षमता असलेले ‘सनोरा सोलर टॉपकॉन मॉडेल’ मार्केटमध्ये लॉन्च झाले आहे. हे मॉडेल कमी जागेत अधिक ऊर्जा उत्पादित करनारे तंत्रज्ञान असे वैशिष्ट्य या मॉडेलचे आहे. यासह कंपनीकडून आपली मॉडेल उत्पादन क्षमता ५०० मेगावॅट (युनिट) पर्यंत वाढवण्यात येईल, अशी माहिती सनोरा सोलरचे संचालक रिधम पटेल यांनी दिली.

सनोरा सोलर कंपनीने त्यांच्या नवीन सोलर पॅनेल टेक्नॉलॉजीबद्दल माहिती देण्यासाठी नुकतेच जंगली महाराज रोड येथील हॉटेल तरवडे क्लार्क इन येथे एका कार्यक्रमाचे अयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संचालक रिधम पटेल यांनी कंपनीच्या विस्तार योजनेबद्दल विस्तृत माहिती दिली. या कार्यक्रमाला महाराष्ट्र सोलर मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशनचे (मास्मा) अध्यक्ष शशिकांत वाकडे, माजी अध्यक्ष रोहन उपासनी, सनोरा सोलरचे राज्याचे वितरक राजेश मुथा, समीर गांधी, संजय कुलकर्णी, जयेश अकोले उपस्थित होते. तसेच सोलर वितरक आणि विक्रेते या कार्यक्रमाच्या दरम्यान मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सनोरा सोलरचे अध्यक्ष शिव पंड्या यांनी टॉपकॉन सोलर पॅनेल टेक्नोलॉजीबद्दल आणि सोलर पार्कबद्दल विस्तृत माहिती उपस्थितांना दिली. त्यांनी टॉपकॉन टेक्नॉलॉजी आणि मोनोपर्क टेक्नॉलॉजीमध्ये काय फरक आहे याबद्दलही माहिती दिली. तसेच यावेळी उपस्थितांचे विविध शंकांचे निरसनही त्यांनी केले. सनोरा सोलर व्यवस्थापनाने आपल्या डीलर आणि वितरक यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक शहर आणि गावात आपल्या नवीन सोलर पॅनेल बसवण्याचा संकल्प केला आहे.

सनोरा सोलर टॉपकॉन मॉडेलमध्ये उत्कृष्ट कार्यक्षमता व सुरक्षितता, ऊर्जेची मोठ्या प्रमाणात बचत, मोठ्या प्रमाणातील वारा, पडलेला बर्फ सहन करण्याची क्षमता, कमीत कमी मायक्रो क्रॅक युनिट, लो लाईट परफॉर्मन्स, पीआयडी रेजिस्टन्स, पॉवर गेन बेनिफिट, हेवी ड्युटी ऍनोडईज्ड अलुमिनिअम फ्रेम अशी अनेक वैशिष्ट्ये आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा