आपल्या देशाचा महान इतिहास सतत प्रेरणादायी – सचिन अडागळे
पिंपरी – क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचलित क्रांतिवीर चापेकर प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून पुणे महा मेट्रोचे अभियंता सचिन अडागळे, क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे उपाध्यक्ष व ज्येष्ठ शास्त्रज्ञ नगरकर, होंडा टू व्हीलर प्रायव्हेट लिमिटेड चे वरिष्ठ अधिकारी आनंद कांबळे तसेच सामाजिक कार्यकर्ते नितीन अडागळे उपस्थित होते.
यावेळी सकाळी विद्यार्थ्यांच्या प्रभात फेरीचे आयोजन करून चापेकर चौकातील चापेकर बंधूंच्या समूह शिल्पास पुष्पहार अर्पण करण्यात आला. नंतर प्रशालेत उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत ध्वजगीत व संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. नंतर मान्यवरांच्या शुभहस्ते भारतमाता व क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.
“देश हा देव असे माझा” हे गौरव गीत इयत्ता चौथी व पाचवी मधील विद्यार्थिनींनी सादर केले. त्यानंतर “जय जय महाराष्ट्र माझा” हे राज्य गीत सादर करण्यात आले. सामूहिक कवायत तसेच साधन कवायत विद्यार्थ्यांनी सादर केली. इयत्ता पाचवी ते सातवी मधील विद्यार्थ्यांनी मानवी मनोर्यांचे सादरीकरण केले.
उपस्थित मान्यवरांचे स्वागत ‘स्वागताचा हा सोहळा ‘ हे स्वागत गीत इयत्ता चौथी व पाचवी मधील विद्यार्थ्यांनीनी स्वागत गीतातून केले. माध्यमिक उच्च माध्यमिक विभागाच्या प्रभारी मुख्याध्यापिका वर्षा जाधव यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले तर प्रशालेतील उपशिक्षिका कयापक मॅडम यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचा परिचय करून दिला व प्रशालेच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचा परिचय करून दिला व प्रशालेच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
इयत्ता चौथी ते अकरावी मधील आरोही कोल्हे, राधिका कोल्हे सार्थकी जाधव अनुजा पिटलेवाढ या विद्यार्थ्यांथीनींनी मराठीत प्रजासत्ताक दिनाची माहिती सांगितली तर इयत्ता सहावीतील हर्षवर्धन गाडेकर व क्रिश मल्हाह या विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेतून प्रजासत्ताक दिनाची माहिती सांगितली.
जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त प्रशालेतील उपशिक्षिका शुभांगी बडवे यांनी विद्यार्थ्यांकडून प्रतिज्ञेचे वाचन करून घेतले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. त्यामध्ये बाल विभागातील विद्यार्थ्यांनी तीन रंग झेंड्याचे व क्रांतिवीर चापेकर बंधूंची प्रतिज्ञा सादर केली. प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी जयस्तुते जयस्तुते,ओ देश मेरे, देश रंगीला रंगीला, फिर भी दिल है हिंदुस्तानी, जिगरा है जिगरा , सुनो गौर से दुनिया वालो तर माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी मै भारत का रहने वाला हू, सुनो गौर से दुनियावालो, आपले सण वआपली संस्कृती ही देशभक्तीपर गीते बहारदार नृत्यातून सादर केली.
भारतीय संस्कृतीचे अंधानुकरण ही मूक अभिनय नाटिका सादर करण्यात आली.
इयत्ता सहावीतील हर्षवर्धन गाडेकर इयत्ता सातवीतील प्राची चव्हाण तसेच इयत्ता अकरावीतील महेश पवार व इयत्ता बारावीतील स्वरूपा कलाटे या विद्यार्थ्यांचा गुणवंत विद्यार्थी म्हणून मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला.
सचिन अडागळे यांनी विद्यार्थ्यांना ज्ञान, चारित्र्य, एकता ह्या राज्यघटनेतील शब्दांचा अर्थ समजावून सांगितला, क्रांतिकारकांनी आपला देश स्वतंत्र केला पण त्यापुढे काम करण्याची जबाबदारी आपली आहे आपल्या देशाचा इतिहास मोठा आहे त्यासाठी थोर महापुरुषांची व क्रांतीकारकांची चरित्रे वाचा याविषयी मार्गदर्शन करून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.नंतर आनंद कांबळे यांनी आपली संस्कृती महान आहे ती जपून ठेवा उत्तम प्रगती करा, अभ्यास करा, शाळेचे व देशाचे नाव मोठे करा याविषयी मार्गदर्शन करून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे उपाध्यक्ष व ज्येष्ठ शास्त्रज्ञ नगरकर सर यांनी विद्यार्थ्यांना निर्व्यसनी राहून कुठल्याही व्यसनाला बळी पडू नये, मोठे व्यक्तिमत्व म्हणून आपण जीवन जगावे व जीवनात प्रामाणिकपणा जोपासावा व वैज्ञानिक प्रयोग करायला शिका याविषयी मार्गदर्शन करून उपस्थित सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या स्तवनाने कार्यक्रमाची सांगता झाली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेतील उपशिक्षक सुधाकर हांडे यांनी केले तर उपस्थित सर्वांचे आभार प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका वासंती तिकोने यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले होते.