Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the rss-post-importer domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home/vishwasa/public_html/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the wp-security-audit-log domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home/vishwasa/public_html/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the updraftplus domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home/vishwasa/public_html/wp-includes/functions.php on line 6121
Vishwa Sahyadri – Page 181 – पाऊल प्रगती चे … नव निर्मिती चे…
Home Blog Page 181

‘पीएमपी’चा मार्ग जुन्नरपर्यंत वाढवा – आ. महेश लांडगे

‘पीएमपी’चा मार्ग जुन्नरपर्यंत वाढवा – आ. महेश लांडगे

Deprecated:  strip_tags(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/vishwasa/public_html/wp-content/themes/Newsmag/loop.php on line 45

पिंपरी, विश्व सह्याद्री ःभोसरी ते जुन्नर या मार्गावर पुणे महानगर परिवहन महामंडळाचे पीएमपीनवीन बस सेवा सुरु करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी केली आहे यावर त्यांनी पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मी नारायण मिश्रा यांना निवेदन दिले आहे. आमदार लांडगे यांच्या वतीने स्थायी समिती सभापती नितीन लांडगे यांनी निवेदन सुपूर्द केले.

या निवेदनात आमदार लांडगे यांनी म्हटले आहे की, पुणे जिल्हात स्वराज्याचे प्रतिक असलेले किल्ले शिवनेरी जुन्नरमध्ये आहे. आपल्या शहरातून अनेक पर्यटक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जात असतात. पिंपरी चिंचवड शहरातील अनेक नागरिक हे मंचर, जुन्नर व आंबेगाव या ठिकाणी नोकरी निमित्त ये-जा करतात, अनेक महिला व विद्यार्थीची संख्या हि मोठ्या प्रमाणावर आहे. या मार्गावर खाजगी वाहनातून प्रवास करणे महिलांना व विद्यार्थ्यांना जोखमीचे असून प्रवास करते वेळी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.

सध्या आपल्या विभागामार्फत मंचर पर्यंतच बससेवा उपलब्ध असून,पुढील प्रवास करताना इतर खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. भोसरी हे ठिकाणाहून अनेक प्रवासी जुन्नर याठिकाणी जाण्यास उपलब्ध असतात. त्यामुळे आपल्या बसचे आर्थिक नुकसानही होणार नाही. त्यामुळे किल्ले शिवनेरी पायथ्यापर्यंत लवकरात लवकर यामार्गावर तात्काळ बससेवा सुरु करावी. तसेच राजगुरुनगर ते मंचर या मार्गावर सर्व ठिकाणी बसथांबावर बसस्टॉप बसवण्यात यावे, अशी मागणी आमदार लांडगे यांनी केली आहे.

पिंपरीतील रसायन कंपनीच्या गोदामास भीषण आग

पिंपरीतील रसायन कंपनीच्या गोदामास भीषण आग

Deprecated:  strip_tags(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/vishwasa/public_html/wp-content/themes/Newsmag/loop.php on line 45

पिंपरी, विश्व सह्याद्री ः पिंपरीतील कामगारनगर भागात असलेल्या डाॕ. बेक या रसायन उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या गोदामास शनिवारी सायंकाळी भीषण आग लागली.

या आगीत कंपनीचे मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.मात्र, सुदैवाने जीवीत हानी झाली नाही. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हीआग लागली असूनही पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे अग्नीशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. या आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.

प्रांताध्यक्षां समवेत शहर काँग्रेस पदाधिका-यांची संघटनात्मक चर्चा

प्रांताध्यक्षां समवेत शहर काँग्रेस पदाधिका-यांची संघटनात्मक चर्चा

Deprecated:  strip_tags(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/vishwasa/public_html/wp-content/themes/Newsmag/loop.php on line 45

पिपंरी दि. १८,
काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष आ.श्री. नाना पटोले यांची आज सोमवारी मुंबई येथील निवासस्थानी पिंपरी चिंचवड शहरातील काँग्रेस पदाधिका-यांनी भेट घेतली. डॅा.कैलास कदम यांच्या काँग्रेस शहर अध्यक्ष पदीनिवडीबाबत शॅाल व पुष्पगुच्छ देत आभार व्यक्त केले व पेढे देऊन आनंद व्यक्त करण्यात आला.

या वेळी पक्ष संघटनात्मक बांधणी व आगामी कामकाजाबाबत पटोले यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली, चर्चेत नाना पटोले यांनी आगामी महानगरपालिका निवडणूकी बाबत मार्गदर्शक सूचना दिल्या व शहरात काँग्रेस संघटना वाढीच्या ठळक बाबी व विशेष तंत्रे समजावून सांगितली व शहरात येऊन बैठक घेण्याबाबतची पदाधिका-यांची विनंती मान्य करत लवकरच शहरात येऊ असा विश्वास दिला.
या प्रसंगी कैलास कदम यांनी आगामी महानगरपालिका निवडणूकीत उत्तम यश मिळविण्याबाबत ची तयारी व नियोजन याबाबत पटोले यांनी माहीती दिली.

या प्रसंगी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव पृथ्वीराज साठे, काँग्रेस चे शहराध्यक्ष डॅा. कैलास कदम, प्रदेश काँग्रेसचे सदस्य अमित मेश्राम व युवक काँग्रेस चे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे आदि उपस्थित होते.

” इतके बेजाबदार सरकार पाहिले नाही ” शरद पवार त्यांची मोदी सरकारवर जळजळीत टीका

” इतके बेजाबदार सरकार पाहिले नाही ” शरद पवार त्यांची मोदी सरकारवर जळजळीत टीका

Deprecated:  strip_tags(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/vishwasa/public_html/wp-content/themes/Newsmag/loop.php on line 45

पिंपरी, (विश्व सह्याद्री ) : सरकारी यंत्रणांचा बेछूट गैरवापर करून राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न केंद्रातील मोदी सरकारकडून केले जात असल्याचा गंभीर आरोप करत आपल्या चोपन्न वर्षांच्या संसदीय कारकिर्दीत सूडाच्या राजकारणाने पेटलेले इतके बेजाबदार सरकार आपण पाहिले नसल्याची जळजळीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी येथे पत्रकार परिषदेत केली.

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक वर्षानंतर शरद पवार दोन दिवसांच्या भेटीवर पिंपरी चिंचवड शहरात दाखल झाले. शनिवारी आमदार अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्ह्म्णाले, ‘केंद्र सरकारच्या अखत्यारीतील सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स, एनसीबी या विविध संस्थांना हाताशी धरून राज्यातील मंत्री, वरिष्ठ अधिकारी, सत्ताधारी राजकीय नेते मंडळींच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावून महाविकस आघाडीचे सरकार अडचणीत आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मला संसदीय राजकारणात ५४ वर्ष झाली. चन्द्रशेखर, इंद्रकुमार गुजराल, देवेगौडा, व्ही. पी. सिह असे अनेक पंतप्रधान पाहिलेत; परंतु, सुडाचे राजकारण करून देशातील बिगर भाजप सरकारे अस्थिर करणारे इतके बेजाबदार सरकार आपण पहिले नाही.

महाविकास आघाडी सरकारचे मंत्री, राजकीय नेते मंडळी यांच्यावर बेछूट खोटे आरोप करायचे मात्र, पुरावे नसतांना चौकशा सुरु करून दडपण आणायचे अशी भाजपची नीती आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांचे नाव न घेता पवार म्हणाले, ‘ एक पोलीस अधिकारी थेट गृहमंत्र्यांवर शंभर कोटी वसूल केल्याचा आरोप करतो. एक नैतिक जबाबदारी म्हणून आम्ही गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतला. मात्र, ज्याने थेट न्यायालयात हे आरोप केले; तो पोलीस अधिकारच परांगदा होतो, हे केंद्र सरकारला माहित नसावे काय, याला काय म्हणावे ? पण, केंद्र सरकार, संबंधित अधिकारी भाजपची नेतेमंडळी हे संगनमताने करीत आहेत.’

राष्ट्रवादीचेप्रवक्ते नवाब मलिक यांचे जावयावर गांजाच्या तस्करीचा खोटा आरोप करून त्यांना सहा महिने जेलमध्ये डांबून ठेवले. आता, तो गांजा नसल्याचे न्यायालयानेच स्पष्ट केले. सत्ता गेल्याने अस्वस्थ झालेले भाजपचे लोक महाविकास आघाडीचे सरकार पडावे कट-कारस्थानं करीत आहेत. पण, आता या सरकारला दोन वर्ष पूर्ण होतील, तरी तिन्ही पक्ष खंबीरपणे एकत्र आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगले काम करीत असून सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करेल असा मला ठाम विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

नवीन भोसरी रुग्णालयातील आयसीयू युनिटचे शरद पवारांच्या हस्ते लोकार्पण

नवीन भोसरी रुग्णालयातील आयसीयू युनिटचे शरद पवारांच्या हस्ते लोकार्पण

Deprecated:  strip_tags(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/vishwasa/public_html/wp-content/themes/Newsmag/loop.php on line 45

पिंपरी : महापालिकेच्या नवीन भोसरी रूग्णालयातील आय.सी.यू विभागाकरीता कॅप जेमिनी कंपनीने सी.एस.आर.फंडातून दिलेल्या १६ बेडसचे लोकार्पण खासदार शरद पवार यांच्या हस्ते झाले. महापौर उषा ढोरे अध्यक्षस्थानी होत्या.

खासदार डॉ.अमोल कोल्हे, स्थायी सभापती नितीन लांडगे, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, नगरसेवक अजीत गव्हाणे, रवी लांडगे, विक्रांत लांडे, नगरसेविका अनुराधा गोफणे, सारीका लांडगे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.पवन साळवे, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.लक्ष्मण गोफणे, कॅप जेमिनी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद शेट्टी, सहाय्यक आयुक्त राजेश आगळे, अण्णा बोदडे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलजा भावसार, डॉ.निलेश ढगे आदी उपस्थित होते.

कॅप जेमिनी कंपनी कडून आज महानगरपालिकेस १० आय.सी.यू यूनीट, ६ व्हेन्टीलेटर, १० मोनिटर, १० सिरींज पंप, १० बेड साईड लॉकर, १ हाई पॉवर एक्सरे मशीन, १ सोनोग्राफी मशीन, २ बायोमेडीकल वेस्ट कंटेनर, १वॉटर प्यूरीफायर, आदी सुमारे २ कोटी ५० लाखाची साहीत्य सी एस आर फंडातून सुपुर्द करण्यात आले. सुत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

शरद पवार उद्यापासून उद्योगनगरीत

0
शरद पवार उद्यापासून उद्योगनगरीत

Deprecated:  strip_tags(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/vishwasa/public_html/wp-content/themes/Newsmag/loop.php on line 45

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार शनिवार (ता. १६) व रविवार (ता. १७) पिंपरी-चिंचवड शहर दौऱ्यावर येत आहेत. पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करणार असून, त्यांच्या हस्ते राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महापालिकेतील भ्रष्टाचार आणि आगामी महापालिका निवडणुकीची व्यूव्हरचना ठरविण्यासाठी शहरातील ‘राष्ट्रवादी’च्या ज्येष्ठ नेत्यांनी शरद पवार यांची गेल्या आठवड्यात भेट घेतली होती. त्या वेळी त्यांनी शहरात येण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार शनिवार व रविवार ते शहरात येत आहेत. त्याबाबत वाघेरे म्हणाले, ‘‘शनिवारी दुपारी साडेतीनला आमदार अण्णा बनसोडे यांच्या चिंचवड स्टेशन येथील कार्यालयात शरद पवार येतील. तिथे राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांचे उद्घाटन करतील. त्यानंतर पक्षाची शहर कार्यकारिणी व आजी-माजी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील. रविवारी दुपारी चारला रहाटणीतील थोपटे लॉन्स येथे पवार यांच्या उपस्थितीत पक्षाचा मेळावा होईल. ’’

पिंपरीत गुरुवारपासून ‘पे अँड पार्क’

पिंपरीत गुरुवारपासून ‘पे अँड पार्क’

Deprecated:  strip_tags(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/vishwasa/public_html/wp-content/themes/Newsmag/loop.php on line 45

विश्व सह्याद्री प्रतिनिधी, पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत पार्किंग पॉलिसी धोरणाचीअंमलबजावणी उद्या(गुरुवार ता.१ जुलै) पासून केली जाणार आहे. शहरात ‘पे अँड पार्क’ योजना लागू होत असून  त्यासाठी १३ मुख्य रस्ते व उड्डाणपुलाखालील काही जागांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये एकूण ४५० पे अँड पार्कची ठिकाणे निश्चित केली आहेत.

महानगरपालिकेच्या स्थापत्य ‘बीआरटीएस’ विभागामार्फत पिंपरी चिंचवड शहरातील पार्किंग धोरणाची अंमलबजावणी करण्याबाबतची कार्यवाही सुरूआहे.  त्या अनुषंगाने पोलीस आयुक्त व त्यांचे संबंधित अधिकारी आणि महापालिका आयुक्त यांच्या समवेत झालेल्या बैठकीत १ जुलै पासून शहरात ‘पे अँड पार्क’ योजनेचे  सुरवात करण्याचे निश्चित केले आहे. त्यामध्ये १३ मुख्य रस्ते व उड्डाणपुलाखालील काही जागांचा समावेश आहे.  पिंपरी चिंचवड शहरातील पार्किंग पॉलिसी धोरणाची अंमलबजावणी करणेसाठी निर्मला ऑटो क्रेन सेंटर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी शहरातील सर्व पार्किंग ठिकाणांची माहिती सर्व नागरिकांना व वाहन चालकांना व्हावी यासाठी  महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या वेबसाईटवर प्रसिध्द  करण्यात आली आहे.  नो पार्किंगच्या ठिकाणांची यादी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय  (वाहतुक विभाग)  प्रसिध्द करणार आहे.

रस्त्यांवरील (ऑन स्ट्रीट पार्किंग)  नावे

१. टेल्को रोड – ५६

२. स्पाईन रोड-  ५५

३. नाशिक फाटा – वाकड बीआरटीएस रस्ता- ४१

४. जुना मुंबई – पुणे रस्ता –  ५८

५. एमडीआर. –३१    – ३९

६. काळेवाडी फाटा ते देहु-आळंदी रस्ता – ३६

७. औंध-रावेत रस्ता- १६

८. निगडी-वाल्हेकरवाडी रस्ता  -२९

९. टिळक चौक-बिग इंडीया चौक रस्ता   -८

१०. प्रसुनधाम सोसायटी  रस्ता- ११

११. थेरगाव गावठाण  रस्ता- १२

१२.नाशिक फाटा-मोशी  रस्ता- २४

१३. वाल्हेकरवाडी  रस्ता – १५

उड्डाणपुलाखालील जागा/ ऑफ स्ट्रीट पार्किंग

१. राँयल ग्लोरी सोसायटी वाकड

२. रहाटणी स्पॉट – १८ मॉल

३. अंकुशराव लांडगे भोसरी सभागृह- भोसरी

४. रामकृष्ण मोरे सभागृह चिंचवड

५. भक्ती शक्ती उड्डाण पूल – निगडी

६. एम्पायर ईस्टेट  उड्डाण पूल  -चिंचवड

७. चाफेकर चौक ब्लॉक – १ चिंचवड

८.चाफेकर चौक ब्लॉक – २ चिंचवड

९. पिंपळे सौदागर वाहनतळ

१० मधुकर पवळे  उड्डाण पूल   निगडी