नवीन लेख

शरद पवार उद्यापासून उद्योगनगरीत

0

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार शनिवार (ता. १६) व रविवार (ता. १७) पिंपरी-चिंचवड शहर दौऱ्यावर येत आहेत. पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करणार असून, त्यांच्या हस्ते राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. महापालिकेतील भ्रष्टाचार आणि आगामी महापालिका निवडणुकीची व्यूव्हरचना ठरविण्यासाठी शहरातील ‘राष्ट्रवादी’च्या ज्येष्ठ नेत्यांनी...

पिंपरीत गुरुवारपासून ‘पे अँड पार्क’

0

विश्व सह्याद्री प्रतिनिधी, पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत पार्किंग पॉलिसी धोरणाचीअंमलबजावणी उद्या(गुरुवार ता.१ जुलै) पासून केली जाणार आहे. शहरात 'पे अँड पार्क' योजना लागू होत असून  त्यासाठी १३ मुख्य रस्ते व उड्डाणपुलाखालील काही जागांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये एकूण ४५० पे अँड पार्कची ठिकाणे निश्चित केली आहेत.           महानगरपालिकेच्या स्थापत्य 'बीआरटीएस' विभागामार्फत पिंपरी चिंचवड शहरातील पार्किंग...

पुण्याचे नवे जिल्हाधिकारी – डाॕ. राजेश देशमुख

विश्व सह्याद्री, पुणे : पुण्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून डाॕ.  राजेश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  नवलकिशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आल्यानंतर त्यांच्याजागी जिल्हाधिकारी म्हणून डॉक्टर राजेश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आयएएस अधिकारी असलेले डॉ. राजेश देशमुख हे हाफकिन इन्स्टिट्युटचे  व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते. 2008 च्या बॅचचे ते आहेत. डॉ. देशमुख यांनी एमपीएससी परीक्षेत राज्यात...

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

करोनाच्या पार्श्वभूमीवर नियम पाळून शाळांमध्ये होणार ध्वजारोहण

विश्व सह्याद्री, पिंपरी करोनासंसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा शहरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांशिवाय शनिवारी (दि. १५) ध्वजवंदन कार्यक्रम होणार आहे. संबंधित कार्यक्रम हा सोशल डिस्टंसिंगचे सर्व नियम पाळून केला जाणार आहे. महापालिका शिक्षण विभागाकडून काही नियम निश्चित केले आहेत. ध्वजवंदनाचा कार्यक्रम शाळास्तरावर सकाळी ८.३५ पूर्वी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शाळा स्तरावर संबंधित कार्यक्रमासाठी सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे. सर्वासाठी मास्क बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांना या कार्यक्रमासाठी...

महापालिका सुरक्षा कर्मचाऱ्यांचे ‘भीख मांगो’ आंदोलन

Old Security Guard  - hansdakbimal1 / Pixabay

नियमित मासिक वेतन मिळत नसल्याचा आरोप पुणे/ प्रतिनिधी महानगरपालिकेच्या सुरक्षा विभागामध्ये कार्यरत असलेल्या माजी सैनिकांना वर्षानुवर्षे नियमित मासिक वेतन मिळत नाही. वेळेवर मासिक वेतन न मिळाल्याने उपचारास विलंब झाल्याने मृत्यूचे प्रकारही घडले आहेत, असा आरोप करीत त्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी महानगरपालिका भवनासमोर   माजी सैनिक कामगार युनियनचे अध्यक्ष डॉ. सुधाकर पणीकर हे आमरण उपोषण आणि   'भीख मांगो' आंदोलन सुरू केले आहे....

जिल्ह्यात स्पेशालिस्ट डॉक्टरांची कमतरता

Vaccine Nurse Covid  Corona  - Ray_Shrewsberry / Pixabay

तासिका तत्वावर खाजगी डॉक्टर्सकडून सेवा पुणे/ प्रतिनिधी शहराबरोबरच जिल्ह्याच्या ग्रामीणभागातही करोनाबाधितांची संख्या वाढत असताना जिल्हा परिषदेकडे तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता आहे. कंत्राटी पद्धतीने  नियुक्तीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीला अल्प प्रतिसाद मिळाल्याने प्रति तास मानधन देऊन खाजगी डॉक्टरांची सेवा घेण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या २०४ पदांसाठी जाहिरात दिली असता केवळ ६ जणांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत. जिल्हा परिषदेच्या वतीने डॉक्टर्स, परिचारिका, मदतनीस...

इस्रो स्मार्ट इंडीया हॅकेथॉन स्पर्धेत पीसीसीओईआरचा प्रथम क्रमांक

Medal Trophy Achievement Award  - qimono / Pixabay

एसव्ही ग्रॅव्हिटी टिमने प्रथम क्रमांकासह एक लाखाचे बक्षिस पटकविले पिंपरी, पुणे (दि. 13 ऑगस्ट 2020) इंडीयन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने (इस्रो) आयोजित केलेल्या ‘स्मार्ट इंडीया हॅकेथॉन 2020’ या राष्ट्रीय स्पर्धेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अँण्ड रिसर्च (पीसीसीओईआर) या महाविद्यालयाच्या ‘एस‌. व्ही. ग्रॅव्हिटी’ या टीमने प्रथम क्रमांक मिळवून एक लाख रुपयांचे बक्षिस पटकविले. इस्रो ही...

पवना धरण ५९ टक्के भरले!

Dam Water Forest Mountains  - HansLinde / Pixabay

विश्व सह्याद्री, पवनानगर (मावळ) : मागील आठवड्यापासून धरण क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पवना धरण गुरूवारी सायंकाळी ५९ टक्के भरले. मावळातील पवना , इंद्रायणी , सुधा , कुंडलिका या नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत . पवना , वलवण , तुंगार्ली , शिरोता , उकसान , जाधववाडी , लोणावळा , मळवंडीठुले , कासारसाई , आढले या धरणांच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढत...

खाद्य पदार्थात आढळली सुतळी हॉटेल चालकाला ५० हजारांचा दंड

Ball Of String String Yarn Ball  - ClaradoodlaK / Pixabay

विश्व सह्याद्री, पिंपरी  : ग्राहकाला दिलेल्या समोशामध्ये सुतळी आढळल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाने देहूरोड बाजारपेठेतील "अशोका स्वीट अँड रेस्टॉरंट' चालकाला ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला. या कारवाईमुळे देहूरोडच्या हॉटेल व्यावसायिकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.  माहिती अधिकार कार्यकर्ते संजय सावंत यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सह आयुक्तांकडे तक्रार केली होती.  गेल्या वर्षी ११ ऑगस्ट २०१९ रोजी सावंत यांच्या पुतण्याने देहूरोड...