नवीन लेख

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

0
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

महापालिका सुरक्षा कर्मचाऱ्यांचे ‘भीख मांगो’ आंदोलन

0
Old Security Guard  - hansdakbimal1 / Pixabay
hansdakbimal1 / Pixabay
नियमित मासिक वेतन मिळत नसल्याचा आरोप
पुणे/ प्रतिनिधी
महानगरपालिकेच्या सुरक्षा विभागामध्ये कार्यरत असलेल्या माजी सैनिकांना वर्षानुवर्षे नियमित मासिक वेतन मिळत नाही. वेळेवर मासिक वेतन न मिळाल्याने उपचारास विलंब झाल्याने मृत्यूचे प्रकारही घडले आहेत, असा आरोप करीत त्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी महानगरपालिका भवनासमोर   माजी सैनिक कामगार युनियनचे अध्यक्ष डॉ. सुधाकर पणीकर हे आमरण उपोषण आणि   ‘भीख मांगो’ आंदोलन सुरू केले आहे. .
उच्च न्यायालय व राज्य शासनाच्या आदेशानुसार ७१ माजी सैनिक कर्मचारी यांना तातडीने कायमस्वरूपी सेवेमध्ये सामावून घेण्यात यावे.  ज्या कामासाठी कर्मचाऱ्याची नेमणूक केली तेच काम त्यांना देण्यात यावे. स्थायी समितीची मंजुरी असूनही मनमानी करून कर्मचाऱ्यांचे वेतनामधून कपात केलेला  युनियनचा खर्च ६ महिन्याला १५०० रुपये तसेच प्रवासभत्ता दरमहा १००० रुपये ही रक्कम तातडीने देण्यात यावी. यापुढे देखील ही कपात न करण्याची हमी द्यावी.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेप्रमाणे पुणे महानगरपालिकेमध्येही माजी सैनिक कर्मचाऱ्यांना दरमहा २५ हजार रुपये मासिक वेतन देण्यात यावे. पुणे महानगरपालिकेमध्ये कार्यरत असणारे माजी सैनिक कर्मचारी यांना पीएफ व ईएसआयचा भरणा करण्याचा आदेश देण्यात यावा, अशा त्यांच्या मागण्या आहेत.

जिल्ह्यात स्पेशालिस्ट डॉक्टरांची कमतरता

0
Vaccine Nurse Covid  Corona  - Ray_Shrewsberry / Pixabay
Ray_Shrewsberry / Pixabay
तासिका तत्वावर खाजगी डॉक्टर्सकडून सेवा
पुणे/ प्रतिनिधी
शहराबरोबरच जिल्ह्याच्या ग्रामीणभागातही करोनाबाधितांची संख्या वाढत असताना जिल्हा परिषदेकडे तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता आहे. कंत्राटी पद्धतीने  नियुक्तीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीला अल्प प्रतिसाद मिळाल्याने प्रति तास मानधन देऊन खाजगी डॉक्टरांची सेवा घेण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या २०४ पदांसाठी जाहिरात दिली असता केवळ ६ जणांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत.
जिल्हा परिषदेच्या वतीने डॉक्टर्स, परिचारिका, मदतनीस अशा १ हजार १२४ वैद्यकीय पदांवर ३ ते ६ महिने कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्तीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून अर्ज दाखल करण्यासाठी १६ ऑगस्टपर्यंत मुदत आहे. मात्र, त्यापैकी केवळ ४१० पदांसाठी उमेदवार मिळाले आहेत. सुपर स्पेशालिटी वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशसाठी घेतल्या जाणाऱ्या NEET परीक्षा दि. १५ सप्टेंबर रोजी होणार असल्यानेही डॉक्टरांकडून या जाहिरातीला प्रतिसाद मिळण्यास अडचणी येत आहेत.
या पार्श्वभूमीवर करोनाच्या संकटकाळात पुरेशा प्रमाणात वैद्यकीय तज्ज्ञ उपलब्ध व्हावे या दृष्टीने जिल्हापरिषदेने तासिका तत्वावर खाजगी डॉक्टरांकडून
सेवा घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र आणि ग्रामीण रुग्णालयात सध्या १ हजार डॉक्टर्स कार्यरत असून आगामी १० दिवसात प्रत्येक तालुक्यात दोन विशेष कोविड आरोग्यसेवा केंद्र सुरू करण्यात येत आहेत. त्याची तयारी अंतिम टप्प्यात असून खाजगी डॉक्टरांना करोनाबाधितांवर उपचारासाठी सहभागी करून घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

इस्रो स्मार्ट इंडीया हॅकेथॉन स्पर्धेत पीसीसीओईआरचा प्रथम क्रमांक

0
Medal Trophy Achievement Award  - qimono / Pixabay
qimono / Pixabay
एसव्ही ग्रॅव्हिटी टिमने प्रथम क्रमांकासह एक लाखाचे बक्षिस पटकविले पिंपरी, पुणे (दि. 13 ऑगस्ट 2020) इंडीयन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने (इस्रो) आयोजित केलेल्या ‘स्मार्ट इंडीया हॅकेथॉन 2020’ या राष्ट्रीय स्पर्धेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अँण्ड रिसर्च (पीसीसीओईआर) या महाविद्यालयाच्या ‘एस‌. व्ही. ग्रॅव्हिटी’ या टीमने प्रथम क्रमांक मिळवून एक लाख रुपयांचे बक्षिस पटकविले. इस्रो ही संस्था अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्तीस चालना मिळावी यासाठी स्मार्ट इंडीया हॅकेथॉन स्पर्धांचे आयोजन करीत असते. या वर्षीच्या ऑनलाईन स्पर्धेत देशभरातून 53 संघानी सहभाग घेतला होता. यामध्ये पीसीसीओईआरच्या श्रीपाद आगाशे, आशुतोष राणे, कुणाल भालेकर, सोनाली उबाळे, पार्थ बोराटे आणि श्रृतिका सरवदे या विद्यार्थ्यांच्या ‘एस.व्ही. ग्रॅव्हिटी’ या टिमने ‘एनएम 385’ च्या ‘व्ह्युज्वलायझेशन ऑफ अर्थ ॲण्ड मून इन व्हर्च्युअल रिॲलीटी’ हा प्रोजेक्ट सादर केला होता. पीसीसीओईआरमध्ये प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग आणि रिसर्च बेस्ड एज्युकेशन शिकविले जाते. यातूनच विद्यार्थ्यांमध्ये नवनवीन संकल्पना उदयास येतात. विद्यार्थ्यांना नाविन्यपुर्ण संशोधन आणि झालेल्या संशोधनाचे पेटंट नोंदणीसाठी तसेच त्याचे स्टार्टअप, उद्योग, व्यवसायात रुपांतर करण्यासाठी पीसीईटीचे विश्वस्त मंडळ व महाविद्यालयाचे प्राध्यापक नेहमी मार्गदर्शन करतात. या टिमला पीसीसीओईआरचे प्राचार्य डॉ. हरिष तिवारी, प्रा. अर्चना चौगुले, प्रा. जमीर कोतवाल आणि समन्वयक प्रा. अच्युत खरे यांनी मार्गदर्शन केले. पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव व्हि.एस. काळभोर, खजिनदार एस.डी. गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व प्राध्यापकांचे अभिनंदन केले.

पवना धरण ५९ टक्के भरले!

0
Dam Water Forest Mountains  - HansLinde / Pixabay
HansLinde / Pixabay

विश्व सह्याद्री, पवनानगर (मावळ) : मागील आठवड्यापासून धरण क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पवना धरण गुरूवारी सायंकाळी ५९ टक्के भरले.

मावळातील पवना , इंद्रायणी , सुधा , कुंडलिका या नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत . पवना , वलवण , तुंगार्ली , शिरोता , उकसान , जाधववाडी , लोणावळा , मळवंडीठुले , कासारसाई , आढले या धरणांच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे . लोणावळ्यात २४ तासांत १५७ मिमी पावसाची नोंद झाली असून यंदा  आजपर्यंत केवळ २५१४ मिमी पावसाची नोंद झाली आहे .

गत वर्षी सुमारे ४९८३ मिमी पावसाची नोंद झाली होती . पवना धरण पाणलोट क्षेत्रात दिवसभरात २७ मिमी पावसाची नोंद झाली . धरणाचा पाणीसाठा ५९ टक्के इतका झाला आहे . गत वर्षी आजअखेर धरणाचा साठा ९६ टक्के झाला होता. लोणावळ्यातील भुशी धरणाच्या पायऱ्यांवरून पुन्हा पाणी ओसंडून वाहू लागले आहे .