Home Uncategorized 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं, केव्हा कुठे होणार मतदान?

5 राज्यातील विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं, केव्हा कुठे होणार मतदान?

0
5 राज्यातील विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं, केव्हा कुठे होणार मतदान?<br />
<b>Deprecated</b>:  strip_tags(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in <b>/home/vishwasa/public_html/wp-content/themes/Newsmag/loop-single.php</b> on line <b>60</b><br />

नवी दिल्ली: पाच राज्यात होणाऱ्या निवडणुकीला निवडणूक आयोगाने हिरवा कंदिल दाखवला आहे. पाच राज्यात 690 जागांसाठी मतदान होणार आहे. आज निवडणुक आयोगाची पत्रकार परिषद होती त्यात ही माहिती देण्यात आली आहे. उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर, उत्तराखंड, पंजाब या राज्यात निवडणुका होणार आहेत. ओमिक्रॉन (Omicron Variant) प्रकारामुळे कोविडचे रुग्ण (Corona) वाढत असल्याने, ECI ने केंद्रीय आरोग्य सचिव आणि गृह सचिव, तज्ञ आणि राज्यांचे आरोग्य सचिव यांच्यासोबत बैठका घेतल्या. त्यांची मते आणि परिस्थिती लक्षात घेतल्यानंतर, ECI ने सुरक्षिततेच्या निकषांसह निवडणुका जाहीर करण्याचा निर्णय घेतला असल्याचे CEC सुशील चंद्रा यांनी सांगितले.

पाचही राज्यांतील विधानसभा निवडणुका एकूण सात टप्प्यांत पार पडतील. उत्तर प्रदेशमध्ये तीन टप्पांमध्ये निवडणुका होणार आहेत. 10, 14, 20, 23, 27 फेब्रुवारी तर 3, 7 मार्च या 7 टप्प्यामंध्ये उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका होणार आहेत. मणिपुरमध्ये निवडणुकीचा पहिला टप्पा 27 फेब्रुवारी, तर दुसरा टप्पा 3 मार्च रोजी पार पडणार आहे. गोवामध्ये 14 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. पंजाबमध्येही 14 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. पाचही राज्यांत मतमोजणी 10 मार्चला होणार आहे.

ECI ने अनिवार्य केले आहे की प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान एक मतदान केंद्र महिलांनी व्यवस्थापित केले पाहिजे. सर्व मिळून विधानसभेच्या 690 जागा आहेत पण आम्ही अशी 1620 मतदान केंद्रे उभारत आहोत. एकूण 18.34 कोटी मतदार या निवडणुकीत भाग घेणर आहेत, त्यापैकी 8.55 कोटी महिला मतदार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिले आहे. 80 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती आणि कोविड-19 चे रुग्ण पोस्टल मतपत्रिकेद्वारे मतदान करू शकतात असे आयोगाने जाहीर केले आहे.

सर्व मतदान केंद्रांवर EVM आणि VVPAT चा वापर केला जाणार आहे. निवडणूक सुरळीत पार पडावी यासाठी निवडणूक आयोगाने पुरेशा प्रमाणात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची व्यवस्था केली आहे. राजकीय पक्षांना त्यांच्या वेबसाइटवर प्रलंबित गुन्हेगारी प्रकरणे असलेल्या व्यक्तींची सविस्तर माहिती निवडणूक उमेदवार म्हणून अपलोड करणे बंधनकारक आहे. त्यांना उमेदवार निवडण्याचे कारणही द्यावे लागणार असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे.

दरम्यान ज्या 5 राज्यांत निवडणुका होणार आहेत त्यापैकी 4 राज्यांमध्ये भाजप प्रणित एनडीएचे सरकार (National Democratic Alliance) आहे. उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांचे सरकार, तर, उत्तराखंडमध्ये पुष्कर सिंग धामी, गोव्यामध्ये प्रमोद सावंत, मणिपूरमध्ये नॉन्गथोम्बम बिरेन सिंग. पंजाबमध्ये काँग्रेसचे चरणजीत सिंग चन्नी हे मुख्यमंत्री आहेत.

गोवा (Goa) राज्याच्या विधानसभेचा कार्यकाळ 15 मार्च रोजी, मणिपूर विधानसभेचा कार्यकाळ 19 मार्च रोजी, उत्तराखंडचा कार्यकाळ 23 मार्च रोजी, पंजाब राज्याचा कार्यकाळ 27 मार्च रोजी आणि उत्तर प्रदेशच्या विधानसभेचा कार्यकाळ 14 मे रोजी संपणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here