- पुणे:अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री मधुरा वेलणकर आता ‘मी, मोगॅम्बो आणि कांदेपोहे’ या शॉर्टफिल्ममध्ये दिसणार आहेत. कॉटनकिंगचे संचालक कौशिक मराठे यांची प्रस्तुती असलेल्या आणि अद्भुत प्रॉडक्शन्सच्या मोनिका धारणकर व वैभव पंडित यांची निर्मिती असलेली ही शॉर्टफिल्म १२ मे रोजी सोशल मीडियाद्वारे प्रदर्शित होणार आहे.
नुकताच या शॉर्टफिल्मचा जबरदस्त टीझर आणि पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला.या शॉर्टफिल्म मध्ये अनिरुद्ध देवधर आणि गंगुबाई फेम सलोनी दैनी हे पण प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.सहज लिखाणासाठी ओळख असलेल्या मोनिका धारणकर यांनी या फिल्मचं लेखन केल आहे आणि ऍड-फिल्म मेकर वैभव पंडीत यांचं दिग्दर्शन आहे.
कॉटनकिंग नेहमीच दर्जेदार शॉर्ट फिल्मद्वारे संवेदनशील विषय मांडत आला आहे. अत्यंत चमत्कारिक असं नाव असलेल्या या त्यांच्या नव्या शॉर्टफिल्मची कथा यावेळी कुठल्या शैलीतील असेल? कशी असेल? सुबोध भावे आणि मधुरा डिजिटल प्लॅटफॉर्मवर आले आहेत म्हणजे काहीतरी कमाल असणार यात शंका नाही.