घर Pune राघव मालवाणीचे पिआनो वाद‌नात सुयश

राघव मालवाणीचे पिआनो वाद‌नात सुयश

15
0

माहेश्वरी विज्ञा प्रचारक मंडळातर्फे ग्लोबल स्टार पुरस्कार

पुणे: प्रतिनिधी

राघव मालपाणी या ७ वर्षाच्या चिमुकल्याला माहेश्वरी विज्ञा प्रचारक मंडळातर्फे ग्लोबल स्टार पुरस्कार देण्यात आला. राघवच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कामगिरी करीता हा पुरस्कार देण्यात आला असून त्यामध्ये त्याला एक ट्रॉफी व एक लक्ष रूपये किमतीचे सुवर्णपदक देण्यात आले.

मंडळातर्फे आयोजित एका विशेष कार्यक्रमामध्ये वैश्विक स्तरावरील १२ मुलांना कला व क्रीडा ह्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीसाठी पुरस्कृत करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून नितीन न्याति, शरद सोनी, मंडळाचे अध्यक्ष अतुल लाहोटी व कार्याध्यक्ष शेखर मुंदडा उपस्थित होते.

नोव्हेंबर महिन्यात थायलंड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय  परफॉरमिंग आर्टस स्पर्धेत राघवने सुवर्णपदक पटकावले होते व UNESCO तर्फ त्याला आर्टीस्ट ऑफ द ईयर हा पुरस्कार देण्यात आला होता. राघवच्या कामगीरीकरीता सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा