घर Uncategorized ‘मानवरहित विमान प्रणाली आणि ड्रोन तंत्रज्ञान’ विषयावर प्रशिक्षण शिबीर

‘मानवरहित विमान प्रणाली आणि ड्रोन तंत्रज्ञान’ विषयावर प्रशिक्षण शिबीर

21
0

पुणे: प्रतिनिधी

भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे ‘मानवरहित विमान प्रणाली आणि ड्रोन तंत्रज्ञान’ या विषयावर मार्गदर्शन, प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या विषयावर प्रत्यक्ष अनुभव देणारे सत्रही आयोजित करण्यात आले.

शिबिराचे उद्घाटन सी-डॅक चे वरिष्ठ संचालक संजीवन जी.,भारती विद्यापीठचे कुलगुरू डॉ. विवेक सावजी, सी-डॅकचे सहसंचालक डॉ. शिवकुमार, सहसंचालक कौशल शर्मा, तंत्र अधिकारी हर्षदा देशपांडे, अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. विदुला सोहनी, उपक्रम प्रमुख डॉ. दीपक बनकर, फॅकल्टी कॉर्डिनेटर स्नेहल चौधरी, सुदर्शना अब्बड यांच्या उपस्थितीमध्ये झाले. या कार्यशाळेमध्ये ८० विद्यार्थ्यांनी विभागप्रमुख आणि प्राध्यापकांनी सहभाग घेतला.

यावेळी बोलताना संजीवन जी. म्हणाले, ‘सरकार मोठ्या प्रमाणावर ड्रोन तंत्रज्ञानाच्या संशोधनावर खर्च करीत आहे. प्रोत्साहन देत आहे. सर्व क्षेत्रातील विस्तार पाहता मानवरहित विमान आणि ड्रोन तंत्रज्ञानाला तरुण आणि कल्पक बुद्धीमान व्यक्तींची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांना त्यात संशोधनाच्या अनेक संधी आहेत’. डॉ.शिवकुमार म्हणाले, ‘सेवा क्षेत्रात ड्रोन उपयुक्त असून रोजगार आणि अर्थार्जनाच्या मोठ्या संधी निर्माण होत आहेत. त्यात सरकारची धोरणे पूरक आहेत. दरवर्षी ड्रोन निर्मिती क्षेत्र १० टक्क्यांनी वाढत आहे. १० लाख व्यक्तींना त्यात रोजगार प्राप्त होणार आहे.

‘या मार्गदर्शन शिबिरातील गुणवान विद्यार्थ्यांना संशोधन प्रकल्पांमध्ये संधी दिली जाईल,’ असे कौशल शर्मा यांनी सांगितले. कुलगुरू डॉ. विवेक सावजी म्हणाले, ‘विद्यार्थ्यांनी अशा शिबिरातून अभ्यासक्रमाच्या पलीकडचे ज्ञान आणि कौशल्ये प्राप्त करावीत. प्रचलित प्रवाहांना समजून घ्यावे आणि संशोधनावर भर द्यावा. ‘डॉ.विदुला सोहोनी म्हणाल्या, ‘मानवरहित विमान आणि ड्रोन तंत्रज्ञान योग्य दिशेने प्रवाहित करण्यासाठी प्रत्यक्ष अनुभव देणारे सत्र उपयुक्त ठरले आहे. याविषयी परस्पर सहकार्य करार करण्यात आले असून त्यामुळे प्रशिक्षण आणि जागृती विषयक उपक्रम केले जाणार आहेत’.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा