घर Politics एनडीएच्या बैठकीसाठी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह मुख्यमंत्री करणार दिल्लीचा दौरा

एनडीएच्या बैठकीसाठी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह मुख्यमंत्री करणार दिल्लीचा दौरा

13
0

मुंबई: प्रतिनिधी

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपावर निर्णय घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीची महत्त्वाची बैठक पुढील आठवड्यात दिल्ली येथे होत आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिघेही उपस्थित राहणार आहेत.

आगामी निवडणुकीत भाजपचा विजयी वारू रोखण्यासाठी विरोधकांनी कंबर कसली आहे. त्यासाठी इंडिया आघाडीच्या रूपाने विरोधक एकत्र आले आहेत तर भाजपकडून या आघाडीला सुरुंग लावण्याचे प्रयत्न होत असून त्याला काही प्रमाणात यशही मिळत आहे.

भाजपने ही या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवण्यासाठी चंग बांधला आहे. लोकसभेच्या तब्बल ४८ जागा असलेल्या महाराष्ट्रातील अधिकाधिक जागांवर विजय मिळवण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. त्यासाठी भाजपचे सहकार्य असलेल्या एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह देवेंद्र फडणवीस बैठकीत सहभागी होणार आहेत. गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत ही महत्त्वपूर्ण बैठक होणार असून या बैठकीत जागावाटप निश्चित करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा