घर National International मालदीवच्या भारतविरोधी राष्ट्रपतींवर महाभियोग चालविण्याची तयारी

मालदीवच्या भारतविरोधी राष्ट्रपतींवर महाभियोग चालविण्याची तयारी

11
0

माले: वृत्तसंस्था

मालदीवचे भारतविरोधी राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांच्यावर महाभियोग चालवून त्यांना पदभ्रष्ट करण्यासाठी मालदीवच्या संसदेतील विरोधकांनी एकजूट केली आहे. राष्ट्रपतींच्या भारत विरोधी धोरणामुळे देश संकटात सापडत आहे, हे देखील त्यांच्यावर महाभियोग चालविण्यासाठी महत्त्वाचे कारण आहे.

मालदीवच्या संसदेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात तुंबळ वाद सुरू आहे. राष्ट्रपती मुइज्जू यांच्या विरोधात महाभियोग चालविण्याची तयारी प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या मालदीवन डेमोक्रॅटिक पार्टीने चालविली आहे. द डेमोक्रॅट्स या पक्षाने देखील या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे.

चीन समर्थक आणि भारत विरोधी राष्ट्रपतींच्या धोरणामुळे देश संकटात सापडल्याचा आरोप करून त्यांच्यावर महाभियोग चालविण्याचा निर्णय डेमोक्रॅटिक पार्टीने घेतला आहे. राष्ट्रपतींवर महाभियोग चालविण्यासाठी संसदेत ५४ मतांची आवश्यकता आहे. मालदीवन डेमोक्रॅटिक पार्टीकडे एकूण ५६ मते आहेत. डेमोक्रॅटिक पार्टीच्या आक्रमक पवित्र्यामुळे मुइज्जू यांच्या राजकीय भवितव्यावर टांगती तलवार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा