घर Maharashtra Special मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी यावे: मनोज जरांगे पाटील

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी यावे: मनोज जरांगे पाटील

45
0

लोणावळा: प्रतिनिधी

छत्रपती संभाजी नगरच्या विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाबरोबर झालेली चर्चा फिसकटल्यानंतर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. इथून पुढे चर्चेसाठी इतर कोणाला पाठवण्यापेक्षा स्वतः मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी समोर येऊन चर्चा करावी, असे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला सुनावले आहे.

अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळावर आपली कोणतीही चर्चा झालेली नाही. त्यांनी केवळ मराठा आरक्षणासाठी सरकारच्या वतीने काय प्रयत्न केले जात आहेत, याची माहिती आपल्याला दिली. अधिकारी सर्वांसमोर बोलण्यासाठी अवघडलेले होते आणि आपलेही जेवण व्हायचे होते यासाठी शिष्टमंडळाचे म्हणणे आतमध्ये ऐकून घेतले. याला बंद करा आणि चर्चा म्हणणे योग्य होणार नाही, असे जरांगे पाटील यांनी सांगितले.

मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन करण्याने सरकारची कोंडी होणार आहे. आमचीही अडचण होणार आहे. आम्हालाही मुंबईत जाण्यात रस नाही तर आरक्षणाबाबत तोडगा निघणे महत्त्वाचे आहे. असा तोडगा काढायचा असेल तर इतर कोणाला पाठविण्यापेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी स्वतः चर्चेसाठी यावे, असेही जरांगे पाटील म्हणाले. राज्यात कायदा सुव्यवस्था राखणे हे सरकारचे काम आहे, आमचे नाही, असेही ते म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा