घर Uncategorized तृणमूल पाठोपाठ ‘आम आदमी’चाही स्वबळाचा नारा

तृणमूल पाठोपाठ ‘आम आदमी’चाही स्वबळाचा नारा

15
0

पंजाबमध्ये लोकसभेच्या सर्व तेरा जागा लढविणार

चंडीगड: वृत्तसंस्था

तृणमूल काँग्रेसच्या पाठोपाठ आम आदमी पक्षानेही इंडिया आघाडीला झटका दिला आहे. आम आदमी पक्ष पंजाबमधील लोकसभेच्या सर्व तेरा जागा स्वबळावर लढणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केली आहे. या निर्णयाला पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पाठिंबा असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

पंजाबमध्ये आम आदमी पक्ष स्वबळावर लोकसभेची निवडणूक लढणार असल्याचे मान यांनी यापूर्वी देखील सार्वजनिक व्यासपीठावरून खुलेपणाने सांगितले आहे. आता या भूमिकेला केजरीवाल यांनी देखील सहमती दिल्याचा खुलासा त्यांनी केला आहे. त्याअर्थी मान यांच्या या भूमिकेवर पक्षाने शिक्कामोर्तब केले आहे.

यापूर्वी तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि प बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपला पक्ष राज्यातील लोकसभेच्या जागा स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा केली आहे. त्यापाठोपाठ भगवंत मान यांनी पंजाबमध्ये आम आदमी पक्षही स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केल्यामुळे एकाच दिवसामध्ये इंडिया आघाडीला दोन झटके बसले आहेत. अशा झटक्यातून सावरून आघाडी आपले अस्तित्व कसे टिकवून ठेवणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

 

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा