घर Pune श्रीराम प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त नमो फाउंडेशनच्या वतीने विशेष कार्यक्रम

श्रीराम प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त नमो फाउंडेशनच्या वतीने विशेष कार्यक्रम

22
0

पुणे: प्रतिनिधी

अयोध्येतील राममंदिर प्राणप्रतिष्ठापना निमित्त देशभर सर्वत्र दिवाळी प्रमाणे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. नमो फौंडेशन च्या वतीने सातारा रस्ता पद्मावती जवळ संपन्न झालेल्या या कार्यक्रमात महाआरती, दिपोत्सव, प्रसाद व आतिषबाजी यांचा समावेश होता.

या कार्यक्रम प्रसंगी कारसेवक प्रसेनजित फडणवीस, भूषण करमरकर, महेश काळे, सलोनी पांयाळ, ब्रम्हकुमारी अरुणादिदी, व आयोजक हरीश परदेशी, अनिल जाधव यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.

आमदार माधुरी मिसाळ, नगरसेवक राजेंद्र शिळीमकर आदी मान्यवरांच्या बरोबरच विविध क्षेत्रातील नागरिक व महिला मोठ्या संखेने उपस्थित होते. या प्रसंगी बोलतांना हरीश परदेशी यांनी अयोध्येत निर्माण करण्यात आलेले रामलल्ला मंदिर हे जगातील सर्वात सुंदर मंदिर असल्याची भावना व्यक्त केली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा