घर Uncategorized अवयवदानाची  महती सांगणाऱ्या “८ दोन ७५” : फक्त इच्छाशक्ती हवी!चा ट्रेलर लाँच

अवयवदानाची  महती सांगणाऱ्या “८ दोन ७५” : फक्त इच्छाशक्ती हवी!चा ट्रेलर लाँच

21
0

मुंबई: प्रतिनिधी

अवयवदान हा अत्यंत गंभीर विषय अतिशय हलक्या फुलक्या पद्धतीनं ८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी! या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. चित्रपटसृष्टीत उत्सुकता निर्माण केलेला हा चित्रपट १९ जानेवारीला प्रदर्शित होणार असून, या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला. “८ दोन ७५” म्हणजे नक्की काय? हे या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल.

उदाहरणार्थ निर्मित या निर्मिती संस्थेचे विकास हांडे, लोकेश मांगडे आणि सुधीर कोलते यांनी ८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी! या चित्रपटाची निर्माती केली आहे, तर सुश्रुत भागवत यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. शर्वाणी – सुश्रुत यांनी चित्रपटाच्या पटकथा लेखनाची, तर संजय मोने यांनी संवाद लेखनाची जबाबदारी निभावली आहे. अभिनेता शुभंकर तावडे, अभिनेत्री संस्कृती बालगुडे यांच्यासह शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे, राधिका हर्षे – विद्यासागर, अश्विनी कुलकर्णी, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ .निखिल राजेशिर्के, सीमा कुलकर्णी पुष्कर श्रोत्री यांच्या चित्रपटात भूमिका आहेत. वैभव जोशी यांनी गीतलेखन, अवधूत गुप्ते यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये ९० पेक्षाही अधिक पुरस्कार या चित्रपटानं मिळवले आहेत.

“८ दोन ७५” : फक्त इच्छाशक्ती हवी! हा चित्रपट देहदानासारख्या महत्त्वाच्या विषयावर बेतला आहे. देहदान केल्यास मृत्यूनंतर आपले अवयव अन्य गरजू रुग्णांच्या कामी येऊ शकतात हा विचार चित्रपटात अतिशय रंजक पद्धतीनं मांडल्याचे   चित्रपटाच्या ट्रेलरमधून दिसतं. त्याशिवाय वैद्यकीय शिक्षणावरही या चित्रपटातून भाष्य करण्यात आलं आहे. त्यामुळे उत्तम स्टारकास्ट असलेला, महत्त्वाचा विषय मनोरंजक पद्धतीनं मांडणारा “८ दोन ७५”: फक्त इच्छाशक्ती हवी! हा चित्रपट आता १९ जानेवारीला चित्रपटगृहात पाहता येईल.

Trailer Link

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा