घर Sports विराटने फलंदाजीच्या शैलीत करू नये मोठे बदल: आकाश चोपडा यांचा सल्ला

विराटने फलंदाजीच्या शैलीत करू नये मोठे बदल: आकाश चोपडा यांचा सल्ला

18
0

नवी दिल्ली: प्रतिनिधी

टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये स्थान टिकविण्यासाठी भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली याने आपल्या फलंदाजीच्या शैलीत फार मोठे बदल करू नये. तसे करणे धावांमध्ये सातत्य राखण्याच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते, असा सल्ला माजी क्रिकेटपटू आकाश चोपडा यांनी दिला आहे.

अफगाणिस्तान बरोबर सुरू असलेल्या टी २० क्रिकेट मालिकेद्वारे विराटचे क्रिकेटच्या या छोट्या प्रकारात पुनरागमन झाले आहे. त्यापूर्वी विराटची फलंदाजी टी २० प्रकाराला अनुरूप राहिली नसल्याची टीका करण्यात येत होती. या टीकेला उत्तर देण्यासाठी विराटने आपल्या फलंदाजीच्या शैलीला अधिक धार आणली आहे. विराटने अफगाणिस्तान संघाबरोबर झालेल्या दुसऱ्या सामन्यात केवळ १६ चेंडूत २९, अर्थात तब्बल १८० च्या स्ट्राईक रेटने धावा काढून आपल्या शैलीतला बदल दाखवून दिला आहे.

मात्र, विराटने आपली फलंदाजीची शैली फार बदलू नये. सध्या विराट हाच टी २० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा जमविणारा फलंदाज आहे. त्याने या प्रकारात तब्बल ४ हजार धावा केल्या आहेत. त्याचा १४० हा स्ट्राइक रेटही उत्तम आहे. विराटने आपल्या शैलीत खूप फरक करून आतापेक्षाही अधिक आक्रमक शैलीचा अवलंब केला तर त्याला सातत्याने धावा करणे कठीण होऊन बसेल, असे मत चोपडा यांनी व्यक्त केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा