घर Politics भाजपला झाला आहे भस्म्या रोग: अनंत गीते यांची टीका

भाजपला झाला आहे भस्म्या रोग: अनंत गीते यांची टीका

26
0

गुहागर: प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षाला भस्म्या रोग झाला आहे. त्यांना राज्य आणि केंद्र दोन्हीकडे सर्वंकष सत्ता हवी आहे. त्यासाठी आतापर्यंत पक्ष फोडून झाले, आता ते घरे फोडायला निघाले आहेत, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे अनंत गीते यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

भाजपमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण गढूळ झाले आहे. केवळ एका माणसाच्या.’मी पुन्हा येईन,’ या हट्टापायी गलिच्छ राजकारण केले जात आहे. भाजपाकडे 105 आमदार आहेत. सत्तेसाठी 40 आमदार फोडले. तरीही त्यांची भूक भागत नाही. राज्याचा कारभार चालविण्याचे काम प्रशासन करीत आहे तर सरकार केवळ आमदार फोडण्याचे उद्योग करीत आहे, असे आरोप गीते यांनी केले.

महिन्याभरात मुख्यमंत्री राजीनामा देणार

न्यायालयीन लढाईत शिंदे गटाचे आमदार निश्चितपणे अपात्र ठरणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर राजीनामा देण्याची वेळ महिन्याभरात येणार आहे. त्यामुळे पुन्हा आपले दिवस येणार आहेत, असा दावा गीते यांनी केला.

सुनील तटकरे यांना गाडणार शरद पवार

आगामी लोकसभा निवडणुकीत आपल्या उमेदवारीची शिफारस खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे, असा दावाही गीते यांनी केला. सुनील तटकरे यांनीच आपले घर फोडले आहे. त्यामुळे आपल्याला त्यांना गाडायचे आहे, असे सांगत पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे रायगडमधून आपल्या उमेदवारीची शिफारस केली, असे गीते म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा