घर Pimpri-Chinchwad सरस्वती विद्यालयात प्रा.भूषण ओझर्डे यांचे करिअर मार्गदर्शन शिबिर उस्फुर्त प्रतिसादात संपन्न

सरस्वती विद्यालयात प्रा.भूषण ओझर्डे यांचे करिअर मार्गदर्शन शिबिर उस्फुर्त प्रतिसादात संपन्न

236
0

पिंपरी : जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थी दशेपासून लक्ष केंद्रित करून परिश्रम आणि सातत्य ठेऊन अभ्यास आवश्यक आहे. त्याचबरोबर योग्य मार्गदर्शन घेऊन स्पर्धा परीक्षांचा मार्ग अवलंबून जीवनात यशस्वी व्हा असे प्रतिपादन प्रा.भूषण ओझर्डे ( शिक्षण तज्ञ, संचालक, ओझर्डे इन्स्टिट्यूट ऑफ रॅडिकल एज्युकेशन ) यांनी केले. सरस्वती विद्यालय येथे आयोजित करियर मार्गदर्शन शिबिरात विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना दिशादर्शक ठरणाऱ्या अशा कार्यक्रमाचे आयोजनाबद्दल आयोजकांचे त्यांनी कौतुक केले.

सरस्वती विद्या मंदिर चे संस्थापक दाभाडे सर आणि अणेकर मॅडम यांनी या व्याख्यानाचे आयोजन केले होते.  सदर करिअर मार्गदर्शन शिबिराला विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. यावेळी 12 वी च्या सायन्स, कॉमर्स, आर्ट्स चे  विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

प्रा. भूषण ओझर्डे यांनी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये विद्यार्थ्यांची संवाद साधत प्रश्नोत्तराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मुलांना शालेय जीवनापासून यशस्वी होण्यासाठी तसेच विविध स्पर्धा परीक्षा देण्यासाठी शालेय जीवनापासूनच कोणती तयारी करावी, अभ्यासाचे नियोजन याविषयी सखोल मार्गदर्शन केले. विठ्ठलवाडी परिसरातूनच ओझर्डे इन्स्टिट्यूटच्या मनीषा कामठे या मंत्रालयात सिलेक्ट होऊन सध्या उपसचिव तर आकुर्डी मधील माधवी कुंभार या सहकार अधिकारी म्हणून काम बघत आहे, त्यांची प्रेरणादायी उदाहरणे देत विध्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविला.

करिअर गायडन्स ची महाराष्ट्रभर 400 पेक्षा जास्त व्याख्याने प्रा. भूषण ओझर्डे यांनी विना मोबदला दिली आहेत. अगदी डी वाय पाटील पासून सिंहगड कॉलेज पर्यंत सर्व मोठ्या महाविद्यालयात, लातूर पासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मुलांना करियर संदर्भात मोफत मार्गदर्शन त्यांनी केले आहे. मावळाची जिल्हा परिषद च्या शाळा, कामशेतचे  पंडित नेहरू विद्यालय, रामकृष्ण मोरे कॉलेज, प्रतिभा कॉलेज पासून अनेक ठिकाणी व्याख्याने त्यांनी  दिली आहेत. साध्या शाळेतील विद्यार्थ्यांना आणि पालकांना, अनेक शिक्षकांनाही यासंदर्भात माहितीची खूप कमतरता आढळते त्या ठिकाणी प्रा. भूषण ओझर्डे आवर्जून उपस्थित राहत असतात. त्यांच्या ओझर्डे इन्स्टिट्यूट चे 700 पेक्षा जास्त विद्यार्थी हे अधिकारी म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सिलेक्ट झाले आहेत.

 

 

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा