घर Pimpri-Chinchwad १०० व्या नाट्य संमेलनाचे यजमान पद मिळणे ही पिंपरी चिंचवड शहराच्या नावलौकिकात...

१०० व्या नाट्य संमेलनाचे यजमान पद मिळणे ही पिंपरी चिंचवड शहराच्या नावलौकिकात भर टाकणारी ऐतिहासिक घटना

32
0

प्रथमच पुणे जिल्ह्यातील चित्रकारांसाठी स्पर्धेचे आयोजन

पिंपरी चिंचवड – स्पर्धा १. शालेय गट, २. महाविद्यालयीन गट व ३. खुला गट अशी तीन गटात घेण्यात आली.नाट्यकलावंत व नाटकातील प्रसंग स्पर्धेसाठी हे दोन विषय देण्यात आले होते.स्पर्धेसाठी कालावधी कमी असूनही बहुसंखेने स्पर्धक सहभागी झाले होते. सदर स्पर्धेचे परिक्षण सुप्रसिध्द शिल्पकार / चित्रकार श्री. प्रमोद कांबळे वडि. वाय्. पाटील कला महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. जयप्रकाश कळवले, यांनी केले. स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे आहे.

शालेय गट – प्रथम क्रमांक – तन्मय महाजन – रु. ५ हजार, द्वितीय क्रमांक – आर्यन शिंदे – रु. ३हजार, तृतीय क्रमांक – वृंदा संभारम – रु. २ हजार, उत्तेजनार्थ – १. आर्यन आचार्य व २. तनय घाडगे – स्मृतिचिन्ह

महाविद्यालयीन गट – प्रथम क्रमांक – कृष्णा मेंगडे – रु. १० हजार, द्वितीय क्रमांक – विराज धांगडा – रु. ७ हजार, तृतीय क्रमांक – राहुल गवळी – रु. ५ हजार, उत्तेजनार्थ – अनिकेत पाटील व जिल सोळंकी – स्मृतिचिन्ह

खुला गट – प्रथम क्रमांक – दिपक मडके – रु. १५ हजार, द्वितीय क्रमांक – स्वरुपा देशमुख – रु. १२ हजार, तृतीय क्रमांक – राहुल देडगे – रु. १० हजार, उत्तेजनार्थ – रमेश खडबडे व विनित नाटेकर – स्मृतिचिन्ह

दिनांक ६ व ७ रोजी शालेय स्पर्धेतील निवडक चित्रांचे प्रदर्शन बालनगरीत तर महाविद्यालयीन व खुल्या गटांतील निवडक चित्रांचे प्रदर्शन रामकृष्ण मोरे नाट्यगृहात आयोजित करण्यात आले होते.

स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षिस वितरण समारंभ अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष व पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष – मा. श्री. भाऊसाहेब भोईर, उपाध्यक्ष – मा. श्री. कृष्णकुमार गोयल व कार्याध्यक्ष – मा. श्री. राजेशकुमार साकला यांच्या हस्ते दिनांक ७ जानेवारी २०२४ रोजी रामकृष्ण मोरे नाट्यगृहात झाला.

स्पर्धेच्या आयोजनासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेचे प्रमुख कार्यवाह – श्री. सुहास जोशी व कोषाध्यक्ष – श्री. राजू बंग यांचेसह चित्रकार श्री. प्रफुल्ल भिष्णूरकर व कलाक्षिक – सौ. लिना आढाव यांनी अथक परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा