घर National International सरोगसीवर जागतिक बंदी घालण्याची पोप फ्रान्सिस यांची सूचना

सरोगसीवर जागतिक बंदी घालण्याची पोप फ्रान्सिस यांची सूचना

18
0

रोम: वृत्तसंस्था

सरोगसी हे मातृत्वाचे बाजारीकरण आहे. गरीब महिलेच्या आर्थिक, सामाजिक दुरावस्थेचा गैफायदा घेऊन तिच्यावर अप्रत्यक्षपणे. मातृत्व लादणे ही माता आणि अर्भक या दोघांची विटंबना आहे. त्यामुळे सरोगसीवर जगभरात बंदी घालावी, अशी सूचना ख्रिश्चन धर्माचे सर्वोच्च गुरू पोप फ्रान्सिस यांनी केली.

‘जागतिक शांतता आणि मानवी सन्मानासमोरची आव्हाने’ या विषयावरील वार्षिक व्याख्यानात ते बोलत होते. सन २०२४ च्या आरंभीच जागतिक शांतता दुबळी झाली आहे. धोक्यात आणली जात आहे. काही ठिकाणी तर ती पूर्णपणे संपुष्टात आली आहे, असेही पोप फ्रान्सिस यांनी आपल्या व्याख्यानात नमूद केले.

रशिया युक्रेन युद्ध, इस्राएल हमास युद्ध, हवामान बदलाचे धोके, आण्विक आणि पारंपारिक शस्त्रास्त्रांचे वाढते उत्पादन अशा मानवतेच्या विरोधातील अनेक संकटांचा उहापोह पोप यांनी आपल्या व्याख्यानात केला.

जन्माला न आलेल्या गर्भाचे संरक्षण करणे आवश्यक आहे. गर्भ नष्ट करणे किंवा त्याला तस्करीचे साधन बनवणे अमानवी आहे. सरोगसी हा महिलेच्या अगतिकतेचा गैरफायदा घेणे आहे. माता आणि मूल या दोघांच्या सन्मानाला त्यामुळे ठेच पोहोचते. मूल ईश्वरी देणगी आहे. ते कोणत्याही व्यावसायिक कराराने करण्यात येणारे उत्पादन समजता कामा नये. त्यासाठी संपूर्ण जगाने सरोगसीवर बंदी घातली पाहिजे, असे आवाहन पोप यांनी केले.

हमासच्या दहशतवादी हल्ल्यामुळे इस्राएलने त्यांच्या विरोधात कठोर लष्करी कारवाईचा मार्ग अवलंबला असून या संघर्षात हजारो नागरिकांचा बळी गेला आहे. इस्राएल आणि हमास यांच्यात त्वरित युद्धबंदी व्हावी. या संघर्षात ओलीस ठेवण्यात आलेल्या नागरिकांची सुटका करावी आणि इस्राएल आणि पॅलेस्टाईन यांनी सामोपचाराने जेरुसलेंमचे विशेष स्थान अबाधित ठेवावे, अशी अपेक्षाही पोप यांनी व्यक्त केली.

 

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा