घर Pimpri-Chinchwad नामांकित मराठी वृत्तपत्रातील छायाचित्र व माहितीच “ पंतप्रधान ते प्रधानसेवक “ मा...

नामांकित मराठी वृत्तपत्रातील छायाचित्र व माहितीच “ पंतप्रधान ते प्रधानसेवक “ मा श्री नरेंद्र मोदी प्रदर्शनाचे आयोजन

59
0

नवं वर्ष … नमो वर्ष २०२४
आपला आदर्श… आपली प्रेरणा नवं भारत निर्माण संकल्पक भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दी वर आधारित कार्य , कर्तव्य , विकास, नव संकल्पना , शासन , प्रशासन व दूरदृष्टी नियोजनावर आधारित महाराष्ट्रातील नामांकित मराठी वृत्तपत्रातील छायाचित्र व माहितीच “ पंतप्रधान ते प्रधानसेवक “ मा श्री नरेंद्र मोदी प्रदर्शनाचे आयोजन कलारंग सांस्कृतिक कलासंस्था , पिंपरी चिंचवड यांच्या वतीने पिं. चिं . महानगरातील प्रसिद्ध प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह कलादालन, पुणे – ३३ येथे दि – ५ ,६, ७ जानेवारी २०२४ तीन दिवस करण्यात आले आहे.

“ पंतप्रधान ते प्रधानसेवक “ मा श्री नरेंद्र मोदी प्रदर्शनाचे उदघाटन मा. आ. श्री श्रीकांतजी भारतीय यांच्या शुभहस्ते सकाळी १०.३० वाजता प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह कलादालन येथे करण्यात येणार आहे. या प्रदर्शनासाठी सन्माननीय उपस्थिती श्री शंकरभाऊ जगताप – शहर अध्यक्ष भा ज पा पिं चिं शहर ( जिल्हा ) , मा. श्री श्रीरंग आप्पा बारणे – खासदार मावळ लोकसभा , मा. आ. श्री महेशदादा लांडगे – आमदार भोसरी विधानसभा , श्रीमती अश्विनीताई जगताप – आमदार चिंचवड विधानसभा , सौ . उमाताई खापरे – आमदार विधान परिषद , सौ वर्षाताई डहाळे – प्रभारी भाजपा पिं चिं शहर ( जिल्हा ) श्री अमर साबळे – माजी खासदार , श्री सदाशिव खाडे – प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा , मा. श्री एड सचिन पटवर्धन – माजी राज्यमंत्री ( दर्जा ) असणार आहेत. मा. श्री नरेंद्र मोदीजी | सिहां सारखी हिंम्मत आणि पहाडा एवढी स्वप्ने घेऊन एका परीपूर्ण भारताची उभारणी करणारा नेता, नेता नव्हे प्रधानसेवक.त्यांच्या नि:स्वार्थी देशसेवेला पाठींबा देण्यासाठी सन्मान पंतप्रधान पदाचा … गौरव प्रधानसेवक कार्याचा … नवा वर्ष नमो वर्ष २०२४ संकल्पना आपण पिंपरी चिंचवड महानगरात राबवित आहोत.

लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकारिता वृत्तपत्रातून प्रकाशित छायाचित्र व बातम्यांच्या संकलनातून आपल्या भारत देशाचे पंतप्रधान मा श्री नरेंद्र मोदीजी यांच्या भारतीय जनता पार्टी च्या राष्ट्रीय अधिवेशन गोवा येथील दि – १३ सप्टेंबर २०१३ ते आज पर्यंत च्या प्रकाशित बातम्यांचे वॉल पोस्टर्स व संकलित पुस्तकातून आम्ही भारतीय नागरिकांपुढे प्रदर्शनाच्या माध्यमातून पुढे आणत आहोत . जवळपास १० वर्षांची माहिती पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांची पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध होणार “ पंतप्रधान ते प्रधानसेवक “ मा श्री . नरेंद्र मोदीजी प्रदर्शनाचे स्वागताध्यक्ष तथा निमंत्रक श्री अमित गोरखे – निवडणूक प्रमुख पिंपरी विधानसभा भाजपा , प्रदर्शनाचे संयोजक श्री नितीन चिलवंत व श्री शिवकुमार सिंह बैस असणार आहेत.

उदघाटक ..
मा. श्री श्रीकांतजी भारतीय
वार : शुक्रवार
दिनांक : ५ जाने २०२४
वेळ – सकाळी – १०.३० वाजता
ठिकाण – प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह कलादालन चिंचवड
( प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहील )

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा