घर Politics उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वतीने माहीम येथील दर्ग्याला चादर अर्पण

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वतीने माहीम येथील दर्ग्याला चादर अर्पण

73
0

मुंबई: प्रतिनिधी

माहीम येथील सुप्रसिद्ध मगदूम अली दर्गा येथे वार्षिक उत्सवानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वतीने चादर अर्पण करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम सारंग यांनी पवार यांच्या वतीने चादर अर्पण केली. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे देखील उपस्थित होते.

माहीम येथील दर्ग्याचा वार्षिक उत्सव एक आठवड्यापासून सुरू आहे या निमित्ताने अजित पवार यांच्या वतीने दर्ग्याला चादर अर्पण करण्यात आली. यावेळी अजमेर शरीफ दर्गा कमिटीचे सदस्य जावेद माजीद पारेख, मौलाना सुफी अहमद रजा कादर, सईद अली, नासीर भाई, सरवर पाटणकर, जावेद अहमद, चांद पाशा खान, मोहीबउल्ला खान आदी मान्यवर उपस्थित होते.

राज्यात सत्तेवर असलेल्या महायुती सरकारच्या कार्यकाळात मुस्लिम समाजाच्या विकासाच्या दृष्टीने प्रयत्न केले जात असून अल्पसंख्याक समाज या राजवटीत सुरक्षिततेचा अनुभव घेत आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून उर्दू शाळा, मौलाना आझाद महामंडळ आणि हज यात्रा याला आवश्यक निधीचा पुरवठा केला जात आहे, अशी ग्वाही सारंग यांनी यावेळी बोलताना दिली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा