घर Uncategorized ‘साहित्यभास्कर शरद गोरे यांना पद्मश्री देण्यात यावी’

‘साहित्यभास्कर शरद गोरे यांना पद्मश्री देण्यात यावी’

32
0

ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात आग्रही मागणी 

सोलापूर: प्रतिनिधी

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयेजित १९ वे अखिल भारतीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलन ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. कविसंमेलनाच्या सत्रात ज्येष्ठ कवी देवेंद्र औटी आपल्या भाषणात म्हणाले की, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष साहित्यभास्कर
शरद गोरे यांची साहित्य क्षेत्रातील अतुलनीय कामगिरी लक्षात घेऊन त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले पाहिजे. उपस्थित कवी, साहित्यिकांनी या मागणीची जोरदार पाठराखण केली.

गोरे यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने शासकीय मदतीवर अवलंबून न राहता आजवर १६० साहित्य संमेलनं आयोजित केली आहेत. इतकी साहित्य संमेलनं घेणारी गोरे हे साहित्य विश्वातील एकमेव व्यक्ती आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन या अगोदरच केंद्र सरकाराने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करायला हवे होते. आता तरी नि:स्पृहपणे साहित्य सेवा करणाऱ्या सोलापूरच्या या भूमिपुत्राचा सन्मान करावा, असे मत औटी यांनी यावेळी व्यक्त केले.

या कविसंमेलनाच्या सत्रात ज्येष्ठ कवी माधव पवार यांच्यासह एकूण ८३ कवींनी सहभाग नोंदविला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा