घर Pune संविधान अभ्यासवर्गात प्रा कोल्हे यांनी करून दिली निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीची ओळख

संविधान अभ्यासवर्गात प्रा कोल्हे यांनी करून दिली निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीची ओळख

27
0

पुणे : प्रतिनिधी

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल यांच्या वतीने आयोजित संविधान अभ्यास वर्गाला शनिवारी सायंकाळी चांगला प्रतिसाद मिळाला.

शनिवार, २३ डिसेंबर २०२३ रोजी गांधी भवन, कोथरूड येथे पुण्यात संविधान अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या अभ्यास वर्गामध्ये ‘महत्वाच्या संविधानिक संस्था : निवडणूक आयोग आणि राज्यपाल’ या विषयावर राज्यशास्त्राचे आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक प्रा. अविनाश कोल्हे यांनी मार्गदर्शन केले.

महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे सचिव आणि युवक क्रांती दलाचे राज्य उपाध्यक्ष संदीप बर्वे यांनी प्रास्ताविक केले. नीलम पंडीत, भूषण भोसले, सुनिल तोंडे यांनी प्रा. कोल्हे यांचा सत्कार केला.

प्रा. कोल्हे यांनी जगातील आणि भारतातील निवडणुकांचा आढावा घेतला. निवडणूक आयोग, कार्य, आचार संहिता, आयोगाचे अध्यक्ष, नेमणूक, अधिकार, हकालपट्टीची प्रक्रिया याबाबत माहिती दिली.   ते म्हणाले, ‘भारतीय निवडणूक हा मोठी प्रक्रिया आहे. निवडणूक आयोग स्वायत्त असून सर्वाधिकार त्यांच्याकडे आहेत. मात्र, त्याची अंमलबजावणी तत्कालीन आयुक्त टी एन शेषन यांनी प्रभावीपणे केली. व्हिडिओ रेकॉर्डंग सारखे तंत्र हाताशी आल्याने त्यांचाही उपयोग झाला.

ही प्रक्रिया सतत उत्क्रांत होत असून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा वापरही सुरू झाला आहे.आता मतदारांच्या मृत्यूच्या नोंदीही निवडणूक आयोगाकडे जातात. ई व्हीं एम यंत्र वरील आक्षेप असले तरी परत जुन्या पद्धतीनें मतदान होणार नाही, मात्र ईव्हीएम यंत्र वापरात सुधारणा होत राहील, असेही प्रा कोल्हे यांनी सांगितले.

निवडणुक आयुक्त नेमण्याच्या प्रक्रियेत नुकत्याच मांडलेल्या विधेयकामुळे मोठा बदल करण्यात आला असून ती वादग्रस्त ठरू शकते. कारण त्या प्रक्रियेतून सरन्यायाधीश यांना वगळण्यात आले आहे. या नेमणुकीत आता न्याय व्यवस्थेचे प्रतिनिधित्व उरलेले नाही, असेही त्यांनी नमूद केले.

 

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा