घर Maharashtra Special मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर करणार आमरण उपोषण

मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर करणार आमरण उपोषण

24
0

बीड: प्रतिनिधी

महाराष्ट्र सरकार दिलेल्या कालमर्यादेत आरक्षण देऊ शकत नसल्यामुळे दि २० जानेवारीपासून थेट मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. आंदोलन काळात हिंसाचार करून मराठा समाजाला गालबोट लागू देऊ नका, असे आवाहनही त्यांनी आंदोलकांना केले आहे.

… तर मराठ्यांची घरे त्यांच्यासाठी बंद

मराठा आंदोलनाच्या धास्तीने मुंबईत १८ जानेवारीपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यानंतर म्हणजेच २० जानेवारीपासून जरांगे पाटील उपोषणाला बसणार आहेत. मराठ्यांच्या मुलांना न्याय देण्यासाठी मराठा मंत्री आणि आमदार यांनी आरक्षण आंदोलनाच्या पाठीशी उभे राहावे. जे मंत्री आणि आमदार या आंदोलनाच्या पाठीशी उभे राहणार नाहीत त्यांच्यासाठी यापुढे मराठ्यांची घरे बंद राहतील, असा इशाराही त्यांनी दिला.

देव आडवा आला तरीही…

मुंबईला जाण्याच्या मार्गाची आखणी आगामी दोन-तीन दिवसात करण्यात येईल. आता कोणत्याही परिस्थितीत माघार नाही. कोण आमचे ट्रॅक्टर अडवतो तेच पाहू. आता देव आडवा आला तरीही मराठा समाज आरक्षण प्राप्त केल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार जरांगे पाटील यांनी व्यक्त केला.

भुजबळ आणि त्यांच्या समर्थकांवर हिंसाचाराचे आरोप

मराठा समाज कधीही जाळपोळ करणार नाही. कुणाच्या घरावर चालून जाणार नाही. मराठा समाज आणि आरक्षण आंदोलनाला बदनाम करण्यासाठी ‘येवल्याच्या येडपटाने’ त्यांच्याच नातेवाईकांची हॉटेल जाळली. यांची घरे यांनीच फोडली आणि आमच्यावर नाव घेत आहेत, असे आरोप जरांगे पाटील यांनी केले.

 

 

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा