घर Uncategorized संस्कृत प्रेमींसाठी रविवारी विशेष एक दिवसीय शिबिराचे आयोजन

संस्कृत प्रेमींसाठी रविवारी विशेष एक दिवसीय शिबिराचे आयोजन

21
0

पुणे: प्रतिनिधी

 पुण्यातील कात्रज परिसरात रविवार दि२४ डिसेंबर २०२३ संस्कृतप्रेमींसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले असून याचे उद्घाटन सकाळी १०.०० वाजता, माऊली गार्डनकात्रजकोंढवामार्गकात्रजपुणे येथे संपन्न होणार आहे.

 संस्कृत ही भारतीय प्राचीन भाषा सरळसोप्या अशा स्वरूपात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. संस्कृत भाषा संवर्धनासाठी संस्कृतभारती ही संस्था गेल्या ४५ वर्षांपासून निरंतर कार्यरत आहेसंस्कृत शिकण्याची इच्छा असणाऱ्या प्रौढांसाठी दहा दिवसांचे संस्कृत संभाषण शिबिरपत्राचारद्वारा संस्कृतशिक्षण योजनागीतेच्या माध्यमातून संस्कृत व्याकरणाचे शिक्षण तर लहान मुलांसाठी बालकेंद्रसरला संस्कृत परीक्षाप्रथमकक्षातः संस्कृतशिक्षणम् असे विविध वर्गउपक्रम संस्कृतभारती द्वारा राबविण्यात येतातयाच कार्याचा एक सर्वसमावेशक उपक्रम म्हणजे हे संमेलन होय.

 संस्कृत भाषेचा प्रसार व्हावा आणि संस्कृत शिकण्याची इच्छा असणाऱ्या सर्व वयोगटातील लोकांना संस्कृतविषयक विविध वर्गांचीशिबिरांचीउपक्रमांची माहिती मिळावी या उद्देशाने संस्कृतप्रेमी लोकांचे हे संमेलन आयोजित केले आहेहे संमेलन पूर्णपणे निःशुल्क असून संस्कृतची आवड असलेलेल्या सर्वांना मुक्त प्रवेश आहे.

 या संमेलनात अनेक मान्यवरांचे मार्गदर्शनसंस्कृतविषयक व्याख्यानेसंस्कृतमधून संभाषणगीतगायनप्रदर्शनीभाषा क्रीडाइत्यादी विविध कार्यक्रम होणार आहेतस्नेहभोजन तसेच संस्कृतविषयक पुस्तक विक्री केंद्रही असणार आहे.

संस्कृत भाषा प्रचाराच्या ध्येयाने प्रेरित होऊन आयोजित या संस्कृत संमेलनात सर्व संस्कृतप्रेमीअभ्यासकशिक्षकविद्यार्थीयांनी बहुसंख्येने सहभागी होण्याचे आवाहन कात्रज संयोजिका सौमुक्ता मराठे यांनी केले आहेअधिक माहितीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा. मुक्ता मराठे (संस्कृत भारती संयोजिका-कात्रज विभाग)

 – 8888802529, 91595 3342

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा