घर India अली दारूवाला यांचा ‘वन इंडिया’ पुरस्काराने गौरव

अली दारूवाला यांचा ‘वन इंडिया’ पुरस्काराने गौरव

23
0

पुणे : प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते अली दारूवाला यांचा  ‘वन इंडिया’ पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. संघ प्रचारक आणि भाजप नेते सुनील देवधर यांनी स्थापन केलेल्या ‘माय होम इंडिया’ संस्थेतर्फे  आयोजित कार्यक्रमात सिक्कीमचे राज्यपाल लक्ष्मण आचार्य यांनी अली दारूवाला यांना हा पुरस्कार प्रदान केला.

मुंबई येथील वीर सावरकर सभागृहात हा कार्यक्रम झाला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकास, एकात्मता आणि राष्ट्रबांधणीसंबंधीच्या योजना प्रभावीपणे अल्पसंख्य समुदायात पोहोचविण्यात दिलेल्या योगदानाबद्दल हा सन्मान करण्यात आला. यावेळी सुनील देवधर यांच्यासह देशभरातील मान्यवर उपस्थित होते.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची धोरणे राष्ट्रहिताची असून देशाला जगात पुढे नेणारी आहेत. या कार्यात आपण योगदान देत राहू. मुख्य राष्ट्रीय प्रवाहात अल्पसंख्य समुदाय येण्याने राष्ट्रीय एकात्मता बळकट होणार आहे,’ असे अली दारुवाला यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितले.

अली दारूवाला हे ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशन (नवी दिल्ली)चे प्रवक्ते तसेच भारतीय जनता पक्षाचेही प्रवक्ते आहेत. अलीकडेच त्यांची राष्ट्रीय अल्पसंख्यक आयोग (नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटीज) चे राष्ट्रीय सल्लागार म्हणूनदेखील नियुक्ती झाली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा