घर Politics कंगना राणावत भाजपच्या तिकिटावर लढवणार लोकसभा निवडणूक

कंगना राणावत भाजपच्या तिकिटावर लढवणार लोकसभा निवडणूक

28
0

नवी दिल्ली: प्रतिनिधी

आपल्या भूमिका आणि अभिनयाबरोबरच सामाजिक आणि राजकीय वक्तव्यांमुळे सातत्याने चर्चेत असलेली अभिनेत्री कंगना राणावत निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर ती लोकसभा निवडणूक लढविणार असून तिला कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी द्यायची याचा निर्णय पक्ष घेईल, असे कंगना से पिता अमरदीप राणावत यांनी स्पष्ट केले.

काही दिवसांपूर्वी कंगनाने भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या कुल्लू येथील निवासस्थानी त्यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच ती निवडणूक रिंगणात उतरणार याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र तिने स्वतःने अथवा भाजपाने याबद्दल कोणतेही अधिकृत भाष्य केलेले नव्हते.

आता खुद्द तिचे पिता अमरदीप राणावत यांनीच कंगना भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढणार असून तिचा मतदारसंघ पक्ष ठरवेल, असे स्पष्टपणे सांगितले आहे.

काही काळापूर्वी गुजरात मधील द्वारका येथे प्रसार माध्यमांशी बोलताना कंगनाने, प्रभूची कृपा असेल तर आपण आगामी लोकसभा निवडणूक लढवू, असे विधान केले होते. त्याचप्रमाणे बिलासपुर येथे भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात ती सहभागीही झाली. तिची वक्तव्य आणि समाज माध्यमातील मजकूर याद्वारे तिने नेहमीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. या पार्श्वभूमीवर कंगना निवडणूक लढवणार अशी अटकळ बांधली जात होती. त्यावर आता अमरदीप यांनी शिक्कामोर्तब केले आहे. तिला पक्षाकडून कोणता मतदारसंघ देण्यात येतो याबद्दलची उत्सुकता मात्र शिल्लक आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा