घर Pune City ‘दस्तकारी हाट-काश्मीर एक्स्पो’ मध्ये ६० टक्क्यांपर्यंत सूट जाहीर

‘दस्तकारी हाट-काश्मीर एक्स्पो’ मध्ये ६० टक्क्यांपर्यंत सूट जाहीर

28
0

पुणे : प्रतिनिधी

काश्मीर मधील कारागिरांनी तयार केलेले कलाकुसरीचे कपडे, साड्या, शाली तसेच सुक्या मेव्याचा समावेश असलेल्या ‘दस्तकारी हाट-काश्मीर एक्स्पो’ या प्रदर्शनात २०, २१ डिसेंबर या शेवटच्या दोन दिवशी खरेदीवर ६० टक्क्यांपर्यंत सूट जाहीर करण्यात आली आहे.

काँग्रेस भवन (शिवाजीनगर) येथे १५ डिसेंबर रोजी प्रदर्शनाचा प्रारंभ झाला.२१ डिसेंबर पर्यंत रोज सकाळी ११ ते रात्री ९ यावेळेत हे प्रदर्शन आणि विक्री सुरु राहील.

खास हिवाळ्यासाठी वूलनचे उबदार कपडे, शाली, स्टोल, पश्मीना प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत. सिल्क साड्या, चंदेरी फॅब्रिक, मुगा सिल्क, कोसा सिल्क, कलमकारी साड्या, बनारसी सिल्क साड्या, कुर्ती, बेड शिट, कार्पेट तसेच अक्रोड, बदामसारखा सुका मेवाही पुणेकरांना उपलब्ध करून देण्यात आला आहे.विणकामाच्या गोष्टीही एकाच छताखाली पाहायला मिळणार आहेत.

.

 

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा