घर Maharashtra Special कारखान्यात झालेल्या स्फोटाने सहा महिलांसह नऊ ठार

कारखान्यात झालेल्या स्फोटाने सहा महिलांसह नऊ ठार

31
0

नागपूर: प्रतिनिधी

स्फोटक रसायने बनवणाऱ्या कारखान्यात पॅकिंग करताना रसायनांचा स्फोट झाल्यामुळे सहा महिलांसह एकूण नऊ कर्मचारी ठार झाले आहेत. ही दुर्घटना सकाळी नऊ वाजता घडली असून पोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोतदार यांनी सांगितले की आज सकाळी नऊ वाजता सोलार एक्सप्लोझिव कास्ट बूस्टर प्लांटमध्ये स्फोटकांचे पॅकिंग करण्याचे काम सुरू असताना हा स्फोट झाला. यावेळी कारखान्यात १३ कर्मचारी काम करत होते. सर्वच कर्मचाऱ्यांना या स्फोटाची झळ पोचली असून नऊ जणांचा मृत्यू झाला आहे.

स्फोटाचा धमाका एवढा जोरदार होता की कारखान्यापासून लांबपर्यंत त्याचा आवाज ऐकू गेला. हा आवाज ऐकून कारखाना समोर आजूबाजूच्या लोकांची मोठी गर्दी जमली. त्यापैकी काही जणांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर मदत आणि बचाव कार्य सुरू झाले.

सोलार एक्सप्लोझिव या कारखान्यात सुरक्षा दलांसाठी ड्रोन आणि स्फोटक पदार्थ यांचे उत्पादन केले जाते. त्याचप्रमाणे कोळशाच्या खाणीत वापरली जाणारी स्फोटकेही या कारखान्यात बनवली जातात. कारखान्यात झालेल्या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या वारसांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा