घर Business अभिषेक कुमार बर्मन यांना सीएसआर जर्नलचा पुरस्कार 

अभिषेक कुमार बर्मन यांना सीएसआर जर्नलचा पुरस्कार 

20
0

पुणे: प्रतिनिधी

नेक्स जेन इंव्हेन्टीव्ह इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी प्रा. लि चे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर अभिषेक कुमार बर्मन यांना सीएसआर जर्नल संस्थेच्या वतीने नुकताच “सोशल वेल्फेअर & ग्रोथ अॅवार्ड भारताचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

मुंबई स्टॅाक एक्स्चेंज येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वन व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार आदी मान्यवरांच्या बरोबरच विविध क्षेत्रांतील दिग्गज उपस्थित होते.

या कार्यक्रमात कुमार विश्वास, श्रीकांत शिंदे, युवराजसिंग व अन्य मान्यवरांनाही विविध क्षेत्रांतील अतुलनीय कार्याबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आले. प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.

आंत्रप्युनर एक्सलंस & डिजिटल ट्रान्स्फॅार्मेशन नेक्समनी या अॅप्लिकेशन बद्दल हा सन्मान करण्यात आला. हे डिजिटल अॅप्लिकेशन आहे ज्यात नागरिक आपले सर्व डिजिटल व्यवहार करू शकतात. यात रोजगार संधी उपलब्ध होतात. गेली १० वर्ष हे कार्यरत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा