घर National International मध्यप्रदेशात धार्मिक स्थळांवर ध्वनिवर्धकावर बंदीचे आदेश

मध्यप्रदेशात धार्मिक स्थळांवर ध्वनिवर्धकावर बंदीचे आदेश

22
0
PM attends swearing in ceremony of new government at Bhopal, in Madhya Pradesh on December 13, 2023.

भोपाळ: प्रतिनिधी

मध्यप्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी पदाची शपथ घेताच धार्मिक स्थळांवर मोठ्या आवाजात ध्वनिवर्धक लावण्यास बंदी करणारा आदेश जारी केला आहे. त्याचप्रमाणे खुल्यावर मांस विक्रीसही बंदी घातली आहे.

यादव यांनी राज्यपाल मंगुभाई पटेल यांनी काल मुख्यमंत्री पदाची शपथ दिली. शपथविधीनंतर त्यांनी उज्जैन येथे जाऊन बाबा महाकालाचे दर्शन घेतले.

पदाचा कार्यभार स्वीकारताच त्यांनी धार्मिक स्थळांवर ध्वनिवर्धक बंदीचा पहिला आदेश जारी केला. या आदेशानुसार धार्मिक स्थळांवर मोठ्या आवाजात ध्वनिवर्धकाचा वापर करता येणार नाही. एक तर ध्वनिवर्धकाचा आवाज अतिशय कमी ठेवावा अथवा तो काढून टाकण्यात यावा, असे बंधन घालण्यात आले आहे. त्याचबरोबर खुल्यावर मांस विक्री करण्यास देखील बंदी घालण्यात आली आहे.

डॉ. यादव हे कट्टर हिंदुत्ववादी म्हणून ओळखले जातात. यापूर्वी शिवराज सिंह सरकारमध्ये ते शिक्षणमंत्री होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात रामचरितमानस हा धार्मिक ग्रंथ महाविद्यालयीन अभ्यासक्रमात ऐच्छिक विषय म्हणून समाविष्ट करण्याचा आदेश काढला होता. त्या देशावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जारी केलेल्या पहिल्या दोन आदेशांवरही मोठ्या प्रमाणात चर्चा झडू लागल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा