घर National International एकीकडे सीमा वादावर चर्चा तर दुसरीकडे घुसखोरी: ड्रॅगन चा विस्तारवादी डाव

एकीकडे सीमा वादावर चर्चा तर दुसरीकडे घुसखोरी: ड्रॅगन चा विस्तारवादी डाव

28
0

नवी दिल्ली: प्रतिनिधी

एकीकडे भूतानबरोबर सीमावाद संपुष्टात आणण्यासाठी चर्चा सुरू ठेवून दुसरीकडे भुतांमध्ये घुसखोरी करण्याचा चीनचा दुटप्पी डाव सॅटेलाईट छायाचित्रांद्वारे उघड झाला आहे. त्यामुळे चीनचे विस्तारवादी आणि वसाहतवादी धोरण पुन्हा जगासमोर आले आहे.

चीन आणि भूतान यांच्यामध्ये दीर्घकाळ सुरू असलेला सीमावाद संपुष्टात आणण्यासाठी दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहे. त्याचवेळी चीनने भूतानमध्ये घुसखोरी करून गावे आणि वसाहती वसविल्याचे उपग्रहावरून घेण्यात आलेल्या छायाचित्रांमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे.

अरुणाचल प्रदेशला लागून असलेल्या भूतांच्या सीमेपासून ५० किलोमीटर अंतरावर थिम्पूच्या आसपासच्या प्रदेशात विशेषतः जकरलुंगच्या पहाडी प्रदेशात चीनने मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा विकसित केल्या आहेत. या प्रदेशात चक्क काही गावे वसविण्यात आली असून लष्करी ठाणेही कार्यान्वित केल्याचे दिसून येत आहे.

जकरलुंग परिसर बेयुल खेनपाजोंगशी संबंधित असल्यामुळे भूतानी नागरिकांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टीने त्याला फार महत्त्व आहे. या भागावर दावा करून केवळ दोन वर्षाच्या कालावधीमध्ये चीनने मोठ्या प्रमाणावर घुसखोरी केली आहे. मॅक्सर संस्थेने  उपग्रहाद्वारे केलेल्या छायाचित्रणामध्ये १२९ इमारतींची उभारणी केल्याचे स्पष्ट दिसत आहे. या ठिकाणापासून काही अंतरावर आणखी एक वसाहत दिसून येत आहे. त्यामध्ये ६२ इमारती दिसत आहेत. यास परिसराच्या सन २०२१ मध्ये केलेल्या छायाचित्रणामध्ये एकही इमारत आढळून येत नाही. याचाच अर्थ चीनने या सर्व इमारती केवळ दोन वर्षात उभ्या केल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा