घर National International महाराष्ट्र आणि कर्नाटकात छापेमारी करून तेरा संशयित दहशतवादी जेरबंद: राष्ट्रीय तपास यंत्रणेची...

महाराष्ट्र आणि कर्नाटकात छापेमारी करून तेरा संशयित दहशतवादी जेरबंद: राष्ट्रीय तपास यंत्रणेची कारवाई

21
0

नवी दिल्ली: प्रतिनिधी

दहशतवादी हल्ल्याच्या कटाची माहिती मिळाल्यानुसार राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने महाराष्ट्र आणि कर्नाटक येथील तब्बल ४१ ठिकाणी छापेमारी करून इसिस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेशी संबंधित १३ संशयित दहशतवाद्यांना जेरबंद केले आहे.

मागील महिन्यात एनआएने अटक केलेल्या इसिसच्या दहशतवाद्याकडून मिळालेल्या माहितीनुसार ही छापेमारी करण्यात आली. कर्नाटकात एका ठिकाणी तर महाराष्ट्रात पुणे (२), ठाणे शहर (९),  ठाणे ग्रामीण (३१) आणि भाईंदर येथे एका ठिकाणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने छापे घातले आहेत. या कारवाईत १३ संशयीतांना ताब्यात घेण्यात आले आहे.

यापूर्वी अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याकडून अहमदाबाद, गांधीनगर या ठिकाणी दहशतवादी हल्ले करण्याचा कट उघडकीला आला आहे. त्याचप्रमाणे भारतातील महत्त्वाची लष्करी ठाणी लक्ष्य करण्यासाठी टेहाळणी करून काढलेली छायाचित्र पाकिस्तान आणि सीरिया या ठिकाणी पाठविण्यात आल्याचेही निष्पन्न झाले आहे. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसारच राष्ट्रीय तपास यंत्रणेने महाराष्ट्र आणि कर्नाटक पोलिसांच्या सहकार्याने छापेमारीची कारवाई केली आहे.

भारतात जिहादी कारवाया करण्यासाठी इसिस मदरसे उघडले असून त्यातून कट्टरपंथी दहशतवादी घडविण्याचे काम सुरू आहे. तरुणांची माती भडकावून त्यांची भरती दहशतवादी संघटनेत केली जात आहे. ताब्यात घेण्यात आलेले १३ संशयित हे त्यापैकीच प्रशिक्षित दहशतवादी असल्याचा एनआयएचा कयास आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा