घर Politics आता लोकसभा विजयासाठी कंबर कसून कामाला लागा: मोदी यांची खासदारांना सूचना

आता लोकसभा विजयासाठी कंबर कसून कामाला लागा: मोदी यांची खासदारांना सूचना

33
0

नवी दिल्ली: प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीत तीन राज्यात पक्षाला मिळालेला विजय हा एकट्या नरेंद्र मोदी यांचा नव्हे तर सर्वांचा सामूहिक विजय आहे, अशा शब्दात भाजप खासदारांचे अभिनंदन करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आपापल्या क्षेत्रात जाऊन लोकसभा निवडणुकीतील विजयासाठी कंबर कसून कामाला लागा, अशी सूचनाही दिली.

नुकत्याच पाच राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीपैकी तीन राज्यात सत्ता हस्तगत केल्याबद्दल भाजप संसदीय पक्षाच्या वतीने पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन करण्यात आले. या बैठकीला लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांचे खासदार उपस्थित होते.

पक्षाने तीन राज्यात मिळवलेला विजय हा सर्वांनी एकजुटीने केलेल्या प्रयत्नांचा विजय आहे. विधानसभांमध्ये सत्ता पुन्हा हस्तगत करण्यात भाजपचे प्रमाण ५८ टक्के तर काँग्रेसचे केवळ १८ टक्के आहे, अशी आकडेवारी मोदी यांनी यावेळी सांगितली.

तीन राज्यातील उल्लेखनीय विजयानंतर आता खासदारांनी आपापल्या मतदारसंघात जाऊन लोकसभा निवडणुकांसाठी काम सुरू करावे. विविध शासकीय योजनांबाबत जनतेमध्ये जागृती करावी. विश्वकर्मा योजनेसारख्या योजना घरोघरी पोहोचवाव्या. तसेच मोठ्या उत्साहाने विकसित भारत संकल्प यात्रेत सहभागी व्हावे. भारताला सन २०४७ पर्यंत विकसित देश बनवण्याचा आपला संकल्प आहे, असे मोदी यांनी नमूद केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा