घर India बांके बिहारी मंदिर कॉरिडॉर उभारणीस न्यायालयाकडून हिरवा कंदील

बांके बिहारी मंदिर कॉरिडॉर उभारणीस न्यायालयाकडून हिरवा कंदील

28
0

लखनऊ: वृत्तसंस्था

बनारस येथील काशी विश्वेश्वर मंदिर कॉरिडॉरच्या धर्तीवर मथुरा येथे बांके बिहारी मंदिर कॉरिडोर उभारण्यास अलाहाबाद उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखविल्याने प्रशासनाने कॉरिडॉर उभारणीसाठी वेगाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. श्रीकृष्णाचा जीवनपट उलगडणारा हा मंदिर कॉरिडॉर भाविक आणि पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.

बांके बिहारी मंदिराच्या चारही बाजूंनी विकसित करण्यात येत असलेल्या या कॉरिडॉरमध्ये तीन मुख्य रस्त्यांचा समावेश असणार आहे. हा कॉरिडोर ११ हजार ३०० चौरस मीटर क्षेत्रावर उभारला जात असून तो दुमजली असणार आहे. त्यापैकी ८०० चौरस मीटर जागे पूजा विधीची साधनसामुग्री उपलब्ध असणारी दुकाने उभारली जाणार आहेत तर ८०० चौरस मीटर क्षेत्र श्रीकृष्णाच्या लीला दर्शविणारी चित्रे प्रदर्शित केली जाणार आहेत. ५ हजार ११३ चौरस मीटर क्षेत्र खुले ठेवण्यात येणार आहे. या कॉरिडॉर मध्ये तब्बल १० हजार भाविकांची पूजाअर्चा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

कॉरिडॉर उभारणी दरम्यान परंपरागत पुजारी आणि सेवेकरी यांचे अधिकार अबाधित राखण्याबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेची सुनावणी मुख्य न्यायाधीश प्रितींकर दिवाकर आणि न्या आशुतोष श्रीवास्तव यांच्या खंडपीठांसमोर पार पडली. याचिकाकर्त्यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकारने हमी दिल्यानंतर न्यायालयाने कॉरिडॉर उभारणीस मान्यता दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा