घर Pune आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांनी लुटला जलक्रीडेचा आनंद

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांनी लुटला जलक्रीडेचा आनंद

15
0

पुणे: प्रतिनिधीभो

ई प्रतिष्ठान च्या पुण्य जागर प्रकल्पांतर्गत अर्धापूर, जिल्हा नांदेड येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या अनाथ मुलांसाठी शिक्षण सेवा प्रकल्प गेल्या सहा वर्षांपासून राबविण्यात येण्यात येत आहे. या अंतर्गत या मुलांचे शैक्षणिक पालकत्व भोई प्रतिष्ठानने स्वीकारले आहे .या उपक्रमांतर्गत हे चिमुकले दिवाळी साजरी करण्यासाठी पुण्यामध्ये आले होते. त्यांच्यासाठी खरेदी ,फराळ आणि स्नेह मेळावा, आनंद मेळावा असा भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .

यामध्ये कृष्णाई वॉटर पार्क मध्ये खेळताना तर या मुलांच्या आनंदाला पारावर राहिला नाही. आयुष्याच्या खडतर प्रवासात जिद्दीने शिक्षण घेत असताना दिवाळीच्या निमित्ताने या मुलांच्या निरागस चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्यासाठी दरवर्षी हा उपक्रम दरवर्षी आयोजित करण्यात येतो, असे प्रतिपादन या कार्यक्रमाचे संयोजक आणि भोई प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॉ. मिलिंद भोई यांनी व्यक्त केले.

या मुलांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी कृष्णाई वॉटर पार्कचे गणेश घुले, गौरव घुले, हेमंत गोसावी, सुभाषशेठ सरपाले आणि भोई प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

दिवाळीच्या निमित्ताने मिळालेला या आनंदाची शिदोरी पुढे वर्षभरातील शैक्षणिक वाटचालीसाठी या चिमुकल्यांना उपयुक्त ठरणार आहे . पुणेकरांनी केलेल्या भरघोस प्रेमाने ही हे सर्व चिमुकले भारावून गेले होते .

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा