घर Maharashtra Special राजमाता जिजाऊ माँ साहेबांचा बोगस वंशज नामदेव जाधवची चौकशी करा : आमदार...

राजमाता जिजाऊ माँ साहेबांचा बोगस वंशज नामदेव जाधवची चौकशी करा : आमदार रोहीत पवार

42
0

पुणे : नामदेव जाधव नावाची व्यक्ती सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःला राजमाता जिजाऊ माँ साहेब यांचे वंशज म्हणवून घेत आहे, मात्र त्यांचा राजे लखोजीराव जाधव आणि जिजाऊ माँ साहेब यांच्या घराण्याशी कोणताही संबंध नसून ती व्यक्ती केवळ प्रसिद्धीसाठी आदरणीय पवार साहेबांवर टीका करत आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरद पवार गट) आमदार रोहीत पवार यांनी केली आहे.

रोहीत पवार म्हणाले आहे की, नामदेव जाधव नावाची व्यक्ती सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःला राजमाता जिजाऊ माँ साहेब यांचे वंशज म्हणवून घेत आहे. याबाबत चौकशी करून त्यांची तोतयेगिरी उघडकीस आणण्याची मागणी स्वराज्य संकल्पक महाराजा राजे लखोजीराव जाधव यांचे वंशज प्रा. राजे गोपाल भगवानराव जाधव यांनी केली. याबाबतचं पत्र त्यांनी दिलं आहे. स्वतःच्या फायद्यासाठी कुणी असं करत असेल तर हे चुकीचं असून याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही रोहीत पवार यांनी केली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा