घर Pimpri-Chinchwad गायत्री इंग्लिश स्कूलचा दिवाळीनिमित्त ‘मूठभर धान्य’ उपक्रम

गायत्री इंग्लिश स्कूलचा दिवाळीनिमित्त ‘मूठभर धान्य’ उपक्रम

32
0

– विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी निर्माण करण्याचा प्रयत्न
– चिखली येथील विकास अनाथ आश्रमाला केली मदत

पिंपरी । प्रतिनिधी
अनाथांची दिवाळी आनंददायी होण्याच्या उद्देशाने भोसरीतील गायत्री इंग्लिश मिडियम स्कूलच्या वतीने मूठभर धान्य उपक्रम राबविण्यात आला. यामधून जमा झालेले गहू, तांदुळ आणि साखर हे धान्य  चिखली येथील विकास अनाथ आश्रमाला देण्यात आले. स्कूलमधील विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी निर्माण करण्यासाठी तसेच या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाच्या (एसव्हीएसपीएम) ग्रायत्री इंग्लिश मीडियम स्कूलमधील सर्व विद्यार्थ्यांनी यासाठी पुढाकार घेतला. यावेळी एसएससी सेक्शनच्या प्राचार्य बाळकृष्ण गोसावी, शिक्षक विनीता लोलयेकर, कोमल ढेरंगे, योगिता अमराळे, प्रिती व विलास खरे आदीसह आश्रमातील विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची तयारी अंकीता भुते यांनी केली. विलास अनाथ आश्रमचे संस्थापक व अध्यक्ष माऊली हरकळ यांनी दिलेल्या धान्याचा स्वीकार केला.

यामध्ये ४९० किलो तांदुळ, १०० किलो गहू, १५ किलो साखर प्रत्येकी देण्यात आली. स्कूलच्या या उपक्रमाचे आश्रमाच्या वतीने कौतूक करण्यात आले.
*
नागरिकांचाही उपक्रमाला प्रतिसाद…
कुटुंबाचा आधार नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना कोवळ्या वयात आश्रमाचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामध्ये आपले शिक्षण पुर्ण करून नोकरी मिळविण्यापर्यंतचा विद्यार्थ्यांचा प्रवास होतो. त्यांना आधार देणार्‍या संस्था देखील विद्यार्थ्यांच्या यशामध्ये मोठा हातभार लावत असतात. मात्र, या संस्था चालविण्यासाठी मोठ्या खर्चिक गोष्टींचा सामना करावा लागतो. त्यांना हातभार लावण्याच्या उद्देशाने तसेच स्कूलमधील विद्यार्थ्यांमध्येही सामाजिक बांधिलकी निर्माण होण्याच्या उद्देशाने गायत्री स्कूलच्या वतीने पुढाकार घेत मूठभर धान्य उपक्रम राबविला. धान्य देण्याबाबत सर्वांना आवाहन केले. नागरिकांनी देखील त्याला प्रतिसाद दिला.
*

प्रतिक्रिया :
शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची भावना वाढीस लागणे आवश्यक आहे. त्यासाठी सातत्याने विविध उपक्रमावर भर देतो. त्याचाच एक भाग म्हणून अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांना धान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी विद्यार्थ्यांनाच मूठभर धान्य उपक्रम राबविण्याच्या सूचना केल्या. विद्यार्थ्यांनी मोठ्या हिरहिरीने सहभाग घेतला.
– विनायक भोंगाळे, संस्थापक अध्यक्ष, एसव्हीएसपीएम, भोसरी.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा