घर Pune अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. मुरहरी केळे

अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. मुरहरी केळे

67
0

नागपूर: प्रतिनिधी

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित ३० व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. मुरहरी केळे यांची निवड करण्यात आल्याची माहिती साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांनी दिली,

अहिल्यादेवी होळकर, संतवाणी, मी एम एस, जगी एैसा बाप व्हावा, शब्दशिल्प, नानी आदी ग्रंथाचे लेखन केळे यांनी केले आहे. अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे,

या अगोदर द.मा.मिराजदार, शिवाजी सावंत, नारायण सुर्वे, वसंत बापट, मंगेश पाडगावकर, सुरेश भट, केशव मेश्राम, विश्वास पाटील, गंगाधर पानतावणे, आ.ह.साळुंखे, नरेंद्र जाधव, भास्कर चंदनशिव, श्रीपाल सबनीस आदी मान्यवर साहित्यिकांनी या साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्षपद भूषविले आहे.१४ ऑक्टोबर २०२३ रोजी वसंतराव देशपांडे सभागृहात हे साहित्य संमेलन संपन्न होणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा