घर Pimpri-Chinchwad हेड – थकबाकीदारांचे धाबे दणाणले; चार दिवसांत 68 मालमत्ता जप्त

हेड – थकबाकीदारांचे धाबे दणाणले; चार दिवसांत 68 मालमत्ता जप्त

35
0

सब हेड- मालमत्ता जप्तीची कारवाई करताच 62 जणांनी भरले पैसे

सब हेड- 6 मालमत्ता सील

सब हेड- जप्ती टाळायची असल्यास थकीत कर भरण्याचे महापालिकेचे आवाहन

पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्यास सुरुवात केली आहे. वारंवार थकीत कर भरण्याचे आवाहन करूनही कर भरण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या 68 जणांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या. त्यामुळे आता मालमत्ता धारकांचे धाबे दणाणले आहेत.  जप्ती पथक दारात जाताच 62 जणांनी तत्काळ धनादेश अथवा रोख पैसे भरले. थकबाकीदारांना आपली मालमत्ता जप्त होऊ नये, यासाठी त्वरित कराचा भरणा करावा, असे आवाहन कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

शहरात निवासी, औद्योगिक, बिगर निवासी, मिश्र, मोकळ्या जमीन अशा  6 लाख 7 हजार नोंदणीकृत मालमत्ता आहेत.  या मालमत्ता धारकांकडून महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभाग कर वसूल करत आहे. गतवर्षी या विभागाच्या वतीने राबविलेल्या विविध उपक्रम, जनजागृती, जप्ती मोहीम, मालमत्ता धारकांना नोटीसा, नळ कनेक्शन बंद करणे, थकबाकीदारांची वृत्तपत्रात नावांची यादी प्रसिद्ध करणे यासह यंदा महिला बचत गटांच्या माध्यमातून बिलांचे घरपोच वाटप, रिक्षाव्दारे जनजागृती, महत्त्वाच्या चौकात होर्डिंग्ज, रिल्स स्पर्धा, सोशल मीडियाचा प्रभावी वापर याचबरोबर

प्रत्येक व्यक्तीला त्याची मालमत्ता कराची रक्कम आणि सवलतीची रक्कम सांगणारा customised sms पाठवला जात होता. अशा विविध बाबींमुळे 2023-24 च्या पहिल्या सहामाहीत 585 कोटी रुपयांचा कर वसूल करण्यात आला आहे. आता वारंवार आवाहन करूनही कर न भरणाऱ्या मालमत्ता धारकांना 1 ऑक्टोबरपासून दोन टक्के विलंब शुल्क लागू झाले आहे. आता थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्यासाठी तीव्र मोहीम हाती घेण्यात आली आहे.

2023-24 या आर्थिक वर्षात आत्तापर्यंत कर संकलन विभागाने 41 हजार, 307 जणांना जप्ती नोटीसा तर 36 हजार 719 मालमत्ता धारकांना जप्ती पत्रे धाडली आहेत. या मालमत्ता धारकांकडे तब्बल 671 कोटी रुपयांचा कर थकीत आहे. नोटीसा देऊनही कर न भरणाऱ्या सुरूवातीला बिगर निवासी व मोकळी जप्त करण्यास सुरुवात केली आहे.

 3 ऑक्टोबरपासून जप्ती माहिती सुरू करण्यात आली असून 2 हजार 184 मालमत्ता धारकांना जप्ती अधिपत्र दिली आहेत. यापैकी 1 हजार 948 मालमत्ता जप्ती अंमलबजावणीसाठी पात्र आहेत. यामध्ये 68 मालमत्तांची जप्ती करण्यात आली. जप्ती करताच 62 जणांनी तत्काळ 87 लाख 37 हजार रुपये रोख अथवा धनादेश जमा केले. तर सहा मालमत्ता या सील करण्यात आल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा