घर Pune महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस कमिटीची अभिवादन यात्रा

महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस कमिटीची अभिवादन यात्रा

32
0

पुणे: प्रतिनिधी

राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने स्व. लालबहाद्दूर शास्त्री पुतळा, दांडेकर पुल ते ना. गोपाळकृष्ण गोखले पुतळा, गुडलक चौक पर्यंत ‘‘अभिवादन’’ रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये महात्मा गांधी यांच्या जीवनातील विविध महत्वांच्या घटनांचे शालेय विद्यार्थ्यांनी नाट्य स्वरूपात रथावर सादरीकरण केले. उदा. दांडी यात्रा, ऐतिहासिक पुणे करार, चले जाव चळवळ, चंपारण्य सत्याग्रह, महात्मा गांधीजींची प्रार्थना इत्यादी विषयांवर शालेय विद्यार्थ्यांनी वेशभूषा केल्या.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. अभय छाजेड म्हणाले की, ‘‘महात्मा गांधी हे जगाचे नेते होते. त्यांनी जगाला सत्य व अहिंसेचा मंत्र दिला, सत्याग्रहासारखे शस्त्र दिले. आज जगातील अनेक देशात अहिंसा दिन पाळला जातो. ’’

यानंतर पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘महात्मा गांधीजींच्या विचारांचे गरज आजही आपल्या भारताला आहे. सत्य, अहिंसा सर्वधर्म समभाव, सेवाभाव, हा गांधीजींचे विचार आजच्या पिढीने अंगीकारने गरजेचे आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस गांधीजींच्या विचारांशी कटीबध्द आहे. महात्मा गांधीजींच्या विचारांना बदनाम करण्याचे षडयंत्र सत्ताधाऱ्यांच्या आशिर्वादाने सुरू असून त्यामध्ये त्यांना कदापिही यश मिळणार नाही. सामान्य भारतीय गांधीजींच्या विचारांना मानतात. गांधी विचारच जागतिक शांततेसाठी गरजेचे आहेत.

स्वातंत्र्य सैनिक, माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांनी ‘जय जवान, जय किसान’ हा नारा देवून भारताला संरक्षण आणि अन्न-धान्याच्या क्षेत्रात स्वंयपूर्ण बनविण्याचे ध्येय साध्य केले. साधी राहणी व उच्च विचार सरणी याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे लालबहाद्दूर शास्त्रीजी होय. काँग्रेस कार्यकर्ते लालबहाद्दूर शास्त्रीजींचे कार्यकतृत्व युवा पिढीसमोर त्यांच्या जयंती दिनी घेऊन जात आहे.’’

यानंतर काँग्रेस भवन येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान    लालबहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार माजी महिला अध्यक्षा नीता रजपूत यांनी मानले.

यावेळी ॲड. अभय छाजेड, बाळासाहेब शिवरकर, अरविंद शिंदे, कमल व्‍यवहारे, नीता रजपूत, वैशाली मराठे, लता राजगुरू, उस्मान तांबोळी, सुधिर काळे, विजय खळदकर, सुनिल शिंदे, मुख्तार शेख, सतिश पवार, द. स. पोळेकर, हेमंत राजभोज, विशाल जाधव, अक्षय माने, राजू ठोंबरे, रमेश सोनकांबळे, रमेश सकट, राजेंद्र भुतडा, विनोद रणपिसे, अभिजीत गोरे, आशितोष शिंदे, अनुसया गायकवाड, सिमा महाडिक, रजिया बल्लारी, सुंदरा ओव्‍हाळ, छाया जाधव, संगीता क्षिरसागर, नलिनी दोरगे, पपिता सोनावणे, शारदा वीर, उषा राजगुरू, कृष्णा सोनकांबळे, रवि ननावरे, भगवान कडू, अजय खुडे, हरिदास अडसूळ आदींसह असंख्य काँग्रेसजन रॅलीमध्ये सहभागी झाले होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा