घर India अमृता तेंडुलकर यांची एनआयपीएम च्या राष्ट्रीय खजिनदारपदी बिनविरोध निवड

अमृता तेंडुलकर यांची एनआयपीएम च्या राष्ट्रीय खजिनदारपदी बिनविरोध निवड

39
0

पिंपरी  : दिनांक : २३ सप्टेंबर २०२३ : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट (एनआयपीएम) च्या राष्ट्रीय खजिनदार पदावर अमृता तेंडुलकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. पुढील दोन वर्षांसाठी ही निवड करण्यात आली आहे.

अमृता तेंडुलकर या गेल्या पंधरा वर्षांपासून मनुष्यबळ व्यवस्थापन क्षेत्राशी संबंधित असून सध्या त्या एनआयपीएम च्या पुणे विभागाच्या सचिव म्हणून कार्यरत होत्या. तसेच स्किल डेव्हलपमेंट व मनुष्यबळ व्यवस्थापन क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असलेल्या ‘यशस्वी ग्रुप’ मध्ये त्या मनुष्यबळ व्यवस्थापक या पदावर सध्या कार्यरत आहेत.

एनआयपीएम ही भारतातील मनुष्यबळ व्यवस्थापकांची राष्ट्रीय पातळीवरील संस्था असून विविध औद्योगिक कंपन्यांच्या मनुष्यबळ व्यवस्थापकांचे प्रश्न सामूहिक प्रयत्नातुन सोडवणे, त्यांच्यासाठी विविध परिसंवाद आयोजित करणे, विविध व्यवस्थापन कार्यशैलीच्या माहितीचे आदान- प्रदान करणे, व्यवस्थापन क्षेत्राविषयीची संशोधन पत्रिका प्रकाशित करणे अशा विविध स्तरावर एनआयपीएमचे कार्य चालते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा