घर Pimpri-Chinchwad गणेशोत्सवानिमित्त प्रा.ओझर्डे यांचे मोफत करिअर गाइडन्स सेमिनारचे रावेत प्राधिकरण समितीकडून आयोजन

गणेशोत्सवानिमित्त प्रा.ओझर्डे यांचे मोफत करिअर गाइडन्स सेमिनारचे रावेत प्राधिकरण समितीकडून आयोजन

213
0

रावेत : रावेतमध्ये रविवारी, 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता 10 वी, 12वी तसेच पदवी च्या विद्यार्थ्यांसाठी रावेत प्राधिकरण समितीच्या लोकमान्य सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ, रावेत यांच्या वतीने मोफत करिअर गाइडन्स सेमिनार आयोजित करण्यात आले आहे. या सेमिनारमध्ये स्पर्धा परीक्षा, बी. टेक, एम. टेक, इंजिनीअरिंग, पॉलिटेक्निक, डी. फार्मसी, बी. फार्मसी, एम. फार्मसी, बीसीए, एमसीए, एलएलबी, एमबीए, यांसह अन्य क्षेत्रांतील करिअरच्या संधीबद्दल शिक्षणतज्ञ प्रा. भूषण ओझर्डे यांच्याकडून  तंत्रशुद्ध विनामूल्य मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात येणार आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी व पालकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन रावेत प्राधिकरण समितीकडून करण्यात आले आहे.

करियरची निवड करणे, विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे असते. या काळात त्यांच्यात ताणतणाव निर्माण होण्याची शक्यता असते. यातूनच अनेक विद्यार्थी चुकीच्या करियरची निवड करू शकतात . त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा पूर्व कालावधीत तसेच परीक्षा दरम्यान, परीक्षेनंतर व निकाला नंतर समुपदेशन करण्याचा, त्यांना करिअर मार्गदर्शन करण्याचे रावेत प्राधिकरण समितीने आयोजिले आहे. यातून विद्यार्थांचा ताणतणाव कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

प्रा. भूषण ओझर्डे यांनी आजपर्यंत साडे सातशे हून अधिक घडविले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या जवळ जवळ सर्वच पोस्टचे अधिकारी आहेत. तसेच इतरही अनेक परिक्षामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अनेकांचे  राज्यात प्रथम, द्वितीय, तृतीत असे क्रमांक आले आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा