घर Politics राज्यघटनेच्या प्रतीतून धर्मनिरपेक्षता व समाजवाद गायब: काँग्रेस नेत्याचा आरोप

राज्यघटनेच्या प्रतीतून धर्मनिरपेक्षता व समाजवाद गायब: काँग्रेस नेत्याचा आरोप

28
0

नवी दिल्ली: प्रतिनिधी

नव्या संसद भवनात प्रवेश करण्यापूर्वी संसद सदस्यांना देण्यात आलेल्या भारतीय संविधानाच्या प्रतींतून धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद हे शब्द गायब असून हा सत्ताधाऱ्यांचा कुटील डाव असल्याचा आरोप काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी केला आहे.

भारतीय राज्यघटनेत सन १९७६ मध्ये करण्यात आलेल्या घटनादुरुस्तीद्वारे त्यामध्ये धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद या शब्दांचा अंतर्भाव करण्यात आला. मात्र नव्या संसदेत प्रवेश करताना खासदारांना देण्यात आलेल्या घटनेच्या प्रतींमध्ये या शब्दांचा समावेश नाही. सत्ताधाऱ्यांनी चतुराईने टाकलेला हा अत्यंत कुटील डाव आहे. याबाबत आपण आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, सत्ताधाऱ्यांकडून आपला आवाज दडपण्याचा प्रयत्न झाला, असा आरोपही चौधरी यांनी केला आहे.

‘भारत आणि इंडिया’वरून निरर्थक संभ्रम

आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे इंडिया ऐवजी भारत हेच नाव अधिकृतरित्या प्रचलित करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. मात्र, भारत आणि इंडिया वरून सत्ताधारी जनतेमध्ये निरर्थक संभ्रम निर्माण करीत आहेत अशी टीकाही चौधरी यांनी केली. वास्तविक भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद १ मध्ये, ‘इंडिया अर्थात भारत हा राज्यांचा एक संघ असेल…’ असे अत्यंत स्पष्ट शब्दात नमूद करण्यात आले आहे, याकडे चौधरी यांनी लक्ष वेधले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा