घर National International ‘विकसनशील देशांच्या अधोगतीला पाश्चात्य देश नव्हे तर…’

‘विकसनशील देशांच्या अधोगतीला पाश्चात्य देश नव्हे तर…’

44
0

परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांची स्पष्टोक्ती 

तिरुअनंतपुरम: वृत्तसंस्था

आशियाई आणि आफ्रिकन राष्ट्रांमध्ये पाश्चिमात्य राष्ट्राबद्दल असंतोषाची भावना दिसते. मी पश्चिमात्य राष्ट्रांची वकिली करणार नाही. मात्र, पाश्चिमात्य राष्ट्र वाईट नाहीत. त्या देशांबद्दलचा गंड आपण मनातून काढला पाहिजे, असे मत परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी व्यक्त केले.

पंतप्रधान विश्वकर्मा योजनेच्या उद्घाटनासाठी येथे दौऱ्यावर असलेल्या जयशंकर यांनी एका खाजगी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत जयशंकर यांनी विविध विषयांवरील मते व्यक्त केली.

जागतिकीकरणानंतर पंधरा ते वीस वर्षाच्या कालखंडात काही देशांची वेगाने प्रगती झाली तर काही देश विकासाच्या बाबतीत मागे पडले. विकासातील या असमानतेमुळे विशेषतः आशियाई आणि आफ्रिकन देशांमध्ये पाश्चिमात्य देशांबद्दल रोष असल्याचे जाणवते. मात्र, पाश्चिमात्य राष्ट्रांनी आपली उत्पादने स्वस्त दरात या देशांच्या बाजारपेठेत आणून ओतली नाहीत, असा दावा करतानाच त्यांनी त्यासाठी चीन जबाबदार असल्याचे सूचित केले.

सध्याच्या काळात उत्पादन आणि रोजगार यामध्ये मोठ्या प्रमाणात घट होताना दिसून येत आहे. त्यामुळे अनेक देशातील आर्थिक आणि सामाजिक समस्यांमध्ये मोठी भर पडली आहे. यांचे कारण त्यांच्या बाजारपेठा देशाबाहेरून आलेल्या स्वस्त उत्पादनांनी ओसंडून वाहत आहेत. मात्र ही उत्पादने पाश्चिमात्य देश आपल्या बाजारात आणून ओतत असल्याच्या पूर्वग्रहातून आपण बाहेर यायला हवे, असे सांगतानाच त्यांनी हे काम चीनकडून होत असल्याचे सूचित केले.

जग हे अत्यंत जटील असून जगासमोर उभी असणारी आव्हाने ही त्याहीपेक्षा अधिक जटील आहेत, असेही जयशंकर यांनी नमूद केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा