घर Health कर्करोगावर विनाशस्त्रक्रिया उपचार करणाऱ्या रुबी हॉल क्लिनिकमधील यंत्रणेची इंद्रेशकुमार यांच्याकडून प्रशंसा

कर्करोगावर विनाशस्त्रक्रिया उपचार करणाऱ्या रुबी हॉल क्लिनिकमधील यंत्रणेची इंद्रेशकुमार यांच्याकडून प्रशंसा

52
0

पुणे: प्रतिनिधी

रूबी हॉल क्लिनिकला भेट देवून येथे उपलब्ध असलेल्या सायबर नाईफ सेवेची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य इंद्रेशकुमार यांनी  पाहणी केली आणि प्रशंसा केली. विना शस्त्रक्रिया कर्करोगावर उपचार करण्याच्या आधुनिक तंत्राची प्रशंसा केली. कर्करोग झालेल्या रूग्णांना बरे करुन मानवतेचे कार्य करावे, दिलासा द्यावा आणि आधुनिक तंत्राचा लाभ द्यावा, असे प्रतिपादन त्यांनी केले.

यावेळी राष्ट्रीय अल्पसंख्यक आयोगाचे सल्लागार अली दारूवाला, रुबी हॉल क्लिनिकचे प्रमुख डॉ परवेझ ग्रँट, मुख्य कार्यकारी अधिकारी बेहराम खोदाईजी उपस्थित होते. क्लिनिकच्या वतीने इंद्रेशकुमार यांचा सत्कार करण्यात आला.

इंद्रेशकुमार यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रीय समन्वय बैठकीच्या पार्श्वभूमीवर सनातन धर्म, समान नागरी कायदा,वन नेशन -वन इलेक्शन, संसदेचे विशेष अधिवेशन या विषयावर मते व्यक्त केली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा